लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : सिंदखेडराजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0 सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली. या यात्रेस शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.अडसूळ फाटा येथून ती दहीगाव येथे आल्यावर मोठी सभा झाली. शेतकरी बांधवांनी पिकांवर येणारे विविध रोग, अवर्षण, अडचणी, भारनियमन, सिंचन सुविधाबाबत विचार मांडले. त्यानंतर यात्रा दुपारी थार, गाडेगाव, बेलखेड येथे गेली. तेथेही शेतकर्यांना मार्गदर्शन व चर्चा पार पडली. चितलवाडी, अडगाव बु., येथे संध्याकाळी चर्चासत्र होऊन नंतर सवाद यात्रा अकोट येथे गेली. या यात्रेतील सभांमध्ये अनिल गावंडे यांनी भारताच्या ६,४0,८६७ खेड्यात आजही ६0 टक्के जनता राहते. या जनतेचा प्रामुख्याने कृषी आणि कृषीपूरक उद्योग हाच व्यवसाय आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७0 वर्षांत आपण ग्रामीण भागाच्या प्रगतीचा आलेख अभ्यासला, तर तो उणेच दिसेल. शेती आणि शेतकर्यांच्या शोषणात या प्रश्नाचे मूळ आहे. पण, या सोबतच अजून खूप सारे ग्रामीण भागातील प्रश्नसुद्धा अनुत्तरित आहेत. ग्रामीण भागातील कोट्यवधी शेतकरी अजून कोणकोणते शेतीविरोधी कायदे अस्तित्वात आहेत, यापासूनही अनभिज्ञ आहेत. आज आमची शेतकर्यांची मुलं शिक्षणासाठी पैसा नाही म्हणून घरी बसली आहेत. आमच्या मुली बसच्या पासला १000 रुपये नाहीत म्हणून आत्महत्या करत आहेत. कित्येक गावाचे प्रश्न फक्त आणि फक्त राजकारणामुळे वर्षानुवर्षे स्थगित आहेत. तेव्हा ग्रामीण भागासाठी तळमळ असलेल्या प्रत्येक माणसाला आज एकत्र येऊन पुन्हा ग्रामीण भागाशी संवाद साधण्याची गरज आहे आणि तेच काम संवाद यात्रेद्वारे करणार आहोत. या प्रवासात आम्ही विदर्भातील पाच जिल्ह्यातील किमान ५0 गावे आणि गावकर्यांचे प्रश्न समजून घेणार आहोत. यात्रा संपल्यावर ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मांडण्यात येतील, असे सांगितले. यावेळी प्रत्येक गावातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संवाद यात्रेदरम्यान अभिजित फाळके, अनिल गावंडे, ललित बहाडे, पुरुषोत्तम आवारे पाटील, अँड. सुधाकर खुमकर, डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, विलास ताथोड, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे उपस्थित होते.
शेतकरी संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 2:35 AM
तेल्हारा : सिंदखेडराजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0 सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली. या यात्रेस शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यात गावागावांतील शेतकर्यांनी व्यक्त केल्या व्यथातेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली