शहरातील न.प. मराठी मुलांच्या शाळा क्र. १ येथे एकूण १७९ व्यक्ती, न. प. मराठी मुलांची शाळा क्र. २ पातूर येथे १३७, पांगरा ग्रा. पं. येथे ४५ तर चान्नी येथे ११४ अशा एकूण ४७५ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. तसेच पातूर तालुक्यात २२ व्यक्तींची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली असता, त्यामध्ये ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच शनिवार, २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पातूर तालुक्यात १ न. प. मराठी मुलांची शाळा क्र. १ पातूर या ठिकाणी कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, पातूर तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी तसेच कोरोना लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे. (फोटो)
---------------------------------
३७ हजारांचा दंड वसूल
पातूर शहर व शिर्ला ग्रा.पं.च्या हद्दीमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारी २०२१ रोजी महसूल विभाग, नगर परिषद, पंचायत समिती, पोलीस विभाग यांचे संयुक्त पथक तयार करून या विभागाच्या समन्वयातून मास्क न वापरणाऱ्या एकूण ६ नागरिकांविरुद्ध प्रत्येकी २०० रुपये एवढ्या रकमेचे एकूण १२०० एवढा दंड वसूल करण्यात आला. आजपर्यंत एकूण १८८ नागरिकांकडून ३७ हजार ६०० एवढा दंड आकारण्यात आला आहे.
----------------------------------------
गजानन बगाडे
खानापूर : पातूर शहरातील गुरुवारपेठ येथील रहिवासी गजानन नारायण बगाडे (६२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)
---------------------------------