अशाेक वाटिका रस्त्यावर धुरळा
अकाेला: शहरातील प्रमुख रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू असून, अशाेक वाटिका ते खदान पाेलीस स्टेशनपर्यंतच्या मार्गावर उड्डाणपुलाच्या कामामुळे मातीचा धुरळा उडत आहे. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या भागात दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर साफसफाई केली जात असल्याचे चित्र आहे.
भाजी बाजारात अस्वच्छता
अकाेला: जुने शहरातील शिवाजी नगर परिसरातील भाजी बाजारात व्यावसायिकांकडून सडका भाजीपाला उघड्यावर फेकला जात असल्याचे चित्र आहे.
भाजी बाजारालगत महापालिकेच्या पश्चिम झाेनचे कार्यालय असले तरीही भाजी बाजारातील अस्वच्छतेकडे लक्ष दिल्या जात नसल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.
नाले, गटारे तुंबली
अकाेला: मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रभागातील तसेच खासगी सफाई कर्मचाऱ्यांना पडीक प्रभागातील नाले, सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे; परंतु सफाई कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे पाेळा चाैक, भांडपुरा येथील नाले, गटारे तुंबल्याचे चित्र आहे.
पथदिव्यांचे टायमर बिघडले
अकाेला: शहरात मनपाच्यावतीने एलईडी पथदिवे उभारण्यात आले परंतु हद्दवाढ क्षेत्रात पथदिव्यांचा अभाव असून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत पथदिव्यांचे टायमर बिघडल्याने पथदिवे रात्री बंद तर दिवसा सुरू राहत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या प्रकाराकडे मनपाच्या विद्युत विभागासह कंत्राटदाराचे दुर्लक्ष हाेत आहे.
साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अकाेला: शहरात काेराेना विषाणूची लागण झालेल्या रुग्ण संख्येत वाढ हाेत असल्याचे समाेर आले आहे. काेराेनाची लाट पाहता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित असताना बाजारात विविध साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसत आहे.
धार्मिक स्थळी गर्दी वाढली
अकाेला: काेराेना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने दिवाळीर्यंत धार्मिक स्थळे बंद ठेवली हाेती. त्यानंतर धार्मिक स्थळे उघडण्यात आली. शहरातील विविध धार्मिक स्थळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत असून यावेळी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते.
शाळेजवळ कचऱ्याचे ढीग
अकाेला: पाेळा चाैकातील मनपा उर्दू मुलांच्या शाळेसमाेर मुख्य रस्त्यालगत उघड्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिसरातील नागरिक उघड्यावर कचरा फेकतात. घंटागाडीत कचरा जमा न करता उघड्यावर अस्वच्छता निर्माण करणाऱ्या नागरिकांवर मनपाने कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
अनावश्यक गतिराेधक हटवा
अकाेला: शहरातील मुख्य रस्ते तसेच प्रभागांमधील गल्लीबाेळात जागाेजागी गतिराेधक बसविण्यात आले आहेत. नागरिक मनमानीरित्या घरासमाेर गतिराेधक उभारत आहेत. यामुळे वाहनचालकांना सांधेदुखीचा त्रास हाेत असून मनपाने तातडीने अनावश्यक गतिराेधक हटविण्याची मागणी हाेत आहे.
अभय याेजनेचा लाभ नाहीच
अकाेला: शहरातील मालमत्ताधारकांकडे थकबाकी असेल तर त्यांना नियमानुसार दाेन टक्के शास्तीचा दंड आकारला जाताे; परंतु मागील तीन वर्षांपासून सत्ताधारी भाजपने शास्ती अभय याेजनेला वारंवार मुदत देण्याचे निर्देश मनपाला दिले. त्यानंतरही या याेजनेकडे अकाेलेकरांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.