रवी दामोदर,अकोला : महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यातील सर्व विभागांतर्गत सर्व वाहकांची विशेष मार्ग तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात दिले आहेत. हा आदेश वाहकांना चोर ठरविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करीत एसटी कामगार सेनेच्या वतीने शनिवारी (१० फेब्रुवारी) अकोला आगार क्र. २ येथे निदर्शने करून निषेध व्यक्त केला.
राज्यसरकाने निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनप्रसंगी एसटी कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव देवीदास बोदडे, विभागीय सचिव उदय गंगाखेडकर, विभागीय अध्यक्ष गिरीश येवलेकर, चंद्रशेखर चऱ्हाटे, भागवत गीरी, गोपाल गावंडे, पुंडलिक घोंगे, आतिफ खतीब, उमेश पाऊलझाडे, मंगेश महलले, ज्ञानेश्वर भटकर, शिवाजी झोडपे, शे. जाकिर, धीरज दांदले, अन्वर मिर्झा, मो समीर, अल्ताफ शाहा, रणजीत मालखेड, इर्शाद खान, बी. डी. कडू, डेपो सचिव आनंद जावरकर आदींची उपस्थिती होती.