जऊळका : कोरोनामुळे ग्रामीण भागातील एसटीची प्रवासी वाहतूकसेवा बंद करण्यात आली आहे. कोरोनाची लाट कमी होत असल्याने, लांब पल्ल्याच्या बसेस सुरू झाल्या आहे, परंतु ग्रामीण भागातील एसटीसेवा बंद आहे.
एक जण पॉझिटिव्ह
अकोट : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे, परंतु अद्यापही कोरोना पूर्णपणे गेला नाही. त्यामुळे सर्वांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. मंगळवारी प्राप्त अहवालात तालुक्यात १ जण कोरोना पॉझिटिव्ह आला.
पेरणीला वेग!
मूर्तिजापूर : तालुक्यात दोन दिवसांपासून भाग बदलत पाऊस बरसत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून रखडलेल्या पेरणीला वेग आला आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.
तालुक्यात सर्वात कमी पाऊस
अकोट : जून महिना संपत आला आहे. मात्र, अद्याप तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस अकोट तालुक्यात झाला असून, ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.
मास्कविना फिरत आहेत नागरिक
अकोट : कोरोनाचा कहर कमी झाला असला, तरी पूर्णपणे गेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. मात्र, नागरिक मास्कविना फिरताना दिसून येत आहेत. अशात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे.
कोविड लसीकरण सुरू
बोर्डी : येथे १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे. स्थानिक जिल्हा परिषद शाळेत लसीकरण सुरू आहे. लसीकरणाला ग्रामपंचायत पदाधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कोरडवाहू शेतकरी चिंतित
तेल्हारा : मान्सूनचे लवकर आगमन झाल्यावर दमदार पावसाचा अंदाज होता, परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोरडवाहू शेतकरी चिंतित आहे.