अकोला : कामगार म्हणून दर महिन्याला कापल्या जाणाºया बारा रुपयांचे गमक गुरुवारी एसटी कामगारांना कळले. कामगार कल्याण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून ही माहिती अकोला आगार क्रमांक दोनमध्ये दिली गेली. बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक आणि एलआयसीच्या शाखा व्यवस्थापकांनी गुरुवारी कामगार कल्याणच्या माध्यमातून बचतीचे धडे दिलेत. कामगारांसाठी असलेल्या योजनांची माहिती प्रथमच मिळत असल्याची कबुली अनेकांनी येथे दिली.कामगार कल्याण केंद्र अकोट फैल अंतर्गत गुरुवारी दुपारी अकोला आगार क्रमांक दोनमध्ये प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आर्थिक बचतीसंबंधी मार्गदर्शन शिबिर घेतले गेले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक अरविंद पिसोळे, बँक आॅफ महाराष्ट्रचे डेप्युटी झोनल मॅनेजर मिलिंद कुळकर्णी, कामगार कल्याण कार्यालयाचे अधिकारी भास्कर भेले, विकास अधिकारी रूपेश मांगुळकर, अनिल बेलोकार, वाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे, एस.एम. उजवणे आणि अकोट फैल कामगार केंद्राचे संचालक विजय रामटेके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दोन सत्रात येथे कार्यक्रम पार पडले. महिन्याच्या १२ रु पये कपातीतून कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजना काय आहेत, याची माहिती येथे देण्यात आली. दहावी-बारावी आणि उच्च शिक्षणासाठी कामगारांच्या पाल्यांना मिळणाºया शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती, एमपीएसी आणि यूपीएससीचा पहिला टप्पा पार करणाºयांसाठी शिष्यवृत्ती, आंतरराष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक सहायता योजना, एमएससीआयटी, वैद्यकीय योजनांची माहिती येथे देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन विजय रामटेके यांनी केले.
एसटी कर्मचाऱ्यांना कळले १२ रुपये कपातीचे गमक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:15 PM
अकोला : कामगार म्हणून दर महिन्याला कापल्या जाणाºया बारा रुपयांचे गमक गुरुवारी एसटी कामगारांना कळले. कामगार कल्याण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून ही माहिती अकोला आगार क्रमांक दोनमध्ये दिली गेली.
ठळक मुद्देकामगार कल्याणच्या माध्यमातून दिले बचतीचे धडेप्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आर्थिक बचतीसंबंधी मार्गदर्शन