लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वॉर्डात कार्यरत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सात दिवसांऐवजी आता दोन दिवसांचाच क्वारंटीन कालावधी मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या नवीन नियमानुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आता पाच दिवस वैद्यकीय सेवा दिल्यानंतर दोन दिवसांची सुटी या प्रमाणे कामकाज चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणाºया रुग्णांना सात दिवस कोविड वॉर्डात रुग्णसेवा दिल्यानंतर सात दिवसांची रजा दिली जायची; परंतु आरोग्य विभागाच्या नवीन नियमानुसार, वैद्यकीय अधिकाºयांना पाच दिवस कोविड वॉर्डात रुग्णसेवा दिल्यानंतर केवळ दोन दिवस सुटी दिली जाणार आहे. याचप्रमाणे नर्सिंग स्टाफलादेखील दोन दिवसांची सुटी दिली जाणार आहे; मात्र जे वैद्यकीय अधिकारी नियंत्रक पदावर कार्यरत आहेत, त्यांना ही पद्धत लागू राहणार नसून, त्यांना नियमित कार्यालयीन वेळेत कामकाज करावे लागणार आहे.या संदर्भात आरोग्य सेवा संचालनालयामार्फत आरोग्य विभागाला पत्र मिळाले असून, त्यानुसार कोविड वॉर्डातील वैद्यकीय कर्मचाºयांना आता सात ऐवजी पाच दिवस रुग्ण सेवा द्यावी लागणार आहे. तर दोन दिवसांची क्वारंटीन म्हणून सुटी मिळणार आहे.
कंत्राटी कर्मचाºयांसोबत दुजाभावसर्वोपचार रुग्णालयात नवीन नियमावलीनुसार, वैद्यकीय कर्मचाºयांच्या ड्युटी लावण्यात येत आहेत; मात्र हे करत असताना संपूर्ण भार हा कंत्राटी वैद्यकीय कर्मचाºयांवर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका कंत्राटी परिचारिकेवर ५० ते ६० रुग्णांचा भार, तर नियमित परिचारिकेसोबत दोन ते तीन कर्मचारी दिले जात असल्याचेही कंत्राटी कर्मचाºयांचे म्हणणे आहे. कंत्राटी कर्मचाºयांसोबत होत असलेला हा दुजाभाव थांबवावा, अशी मागणी कंत्राटी कर्मचाºयांकडून वरिष्ठांकडे करण्यात आली आहे; परंतु त्याकडे अधिकाºयांकडून दुर्लक्ष केले जात आहे.