शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

निकषांना ठेंगा; मोठी उमरी रस्त्याचे काम दर्जाहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 2:33 PM

अकोला: प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या मोठी उमरी भागातील रेल्वेगेट ते गुडधीपर्यंत निर्माणाधीन डांबरी रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कंत्राटदाराने निकष-नियम धाब्यावर बसवत रस्त्याचे काम सुरू केले आहे.

अकोला: प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या मोठी उमरी भागातील रेल्वेगेट ते गुडधीपर्यंत निर्माणाधीन डांबरी रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कंत्राटदाराने निकष-नियम धाब्यावर बसवत रस्त्याचे काम सुरू केले आहे. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन सुधारणा न केल्यास आंदोलनाचा मार्ग मोकळा असल्याचा इशारा निवेदनाद्वारे शिवसेनेने दिला आहे.महापालिका क्षेत्रात सामील झालेल्या मोठी उमरी ते गुडधीपर्यंत चार पदरी डांबरी रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत के ले जात आहे. यासाठी २ कोटी ३४ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. संबंधित विभागाने २१ नोव्हेंबर २०१६ रोजी वर्क आॅर्डर जारी केली होती. यामध्ये सहा महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश होते. सी.आर. कन्स्ट्रक्शन नामक कंत्राटदाराकडून डांबरी रस्त्याचे काम केले जात असले तरी सदर कंत्राटदाराने सर्व निकष-नियम धाब्यावर बसवल्याचे शिवसेनेच्या तक्रारीत नमूद आहे. फेब्रुवारी महिना उजाडला असला तरी अद्यापही रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. येत्या १९ फेबु्रवारी रोजी या भागात शिवजयंतीचा मोठा उत्साह साजरा केला जातो. रस्त्याची संथगती पाहता मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे यांनी रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर यांनी केली. याप्रसंगी नगर सेवक मंगेश काळे, उपशहर प्रमुख केदार खरे, अभिषेक खरसाडे, जि.प. सर्कल प्रमुख दिनेश सरोदे,पप्पू चौधरी, गजानन बोराळे, अविनाश मोरे,अनिल परचुरे, विशाल कपले, निशांत सरोदे, नंदकिशोर ढाकरे, प्रकाश वानखडे, भूषण हागे, विलास मुंडोकार, प्रमोद धर्माळे, मुन्ना भाकरे, हर्षल ताडम, मयूर मोरे, वैभव खेडकर, मनोज तायडे, जयेश पांढरे, अक्षय हरणे, नागेश, राहुल गवळी, उमेश जोशी, अमोल शर्मा, शुभम वानखडे, अक्षय गावंडे, गजानन विटनकर, गणेश टाले, अक्षय बघेवार, राहुल ताथोड, आकाश आसोलकर, महादेव कपले, आशुतोष बोबळे, कुणाल नावकार, अभिजित गोंडचवर, अजय पीठणकर, नितीन खेडकर, योगेश विश्वकर्मा, दिनेश कावळे, अजय ताथोड यासंह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.दर्जाहीन कामाकडे दुर्लक्ष का?कंत्राटदाराने १६.६९ टक्के कमी दराने सादर केलेली निविदा पीडब्ल्यूडीने मंजूर केली असून, रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. रस्त्यासंदर्भात माहिती फलक लावण्यात आला नसून, रस्त्याची रुंदी १५.७० मीटर असताना प्रत्यक्षात १५.३० मीटर अंतराचा रस्ता तयार केला जात असताना प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष का, असा सवाल सेनेने उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका