अकाेला: महापालिकेच्या भूमिगत गटार याेजनेमध्ये शिलाेडा येथे ३० एमएलडीच्या ‘एसटीपी’ची उभारणी करण्यात आली. एसटीपी कार्र्यान्वित करण्यासाठी याठिकाणी ३३ केव्ही एक्स्प्रेस फिडरच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून ५३ लाख रुपयांच्या वाढीव कामाला स्थायी समितीचे सभापती सतीश ढगे यांनी मंजुरी दिली. गुरुवारी मनपात ऑनलाईनद्वारे स्थायी समितीच्या सभेचे कामकाज पार पडले.
केंद्र शासनाने मंजूर केलेल्या ‘अमृत’अभियान अंतर्गत ७९ काेटी रुपयांतून शहरात भूूमिगत गटार याेजना निकाली काढली जात आहे. भूयारी गटार याेजनेत शिलाेडा येथे मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राची (सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट) व वेटवेल पम्पिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याने त्यासाठी ३३ केव्ही एक्स्प्रेस फिडरच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले. याकरिता ओव्हरहेड केबलचे जाळे टाकल्या जात असून वाढीव केबल टाकण्यासाठी महावितरण कंपनीकडून सुधारित अंदाजपत्रक मजीप्रामार्फत मनपाच्या जलप्रदाय विभागाला प्राप्त झाले. ओव्हर हेड केबलच्या लांबीमध्ये वाढ झाल्याने त्यासाठी लागणाऱ्या विद्युत उपकरणांमध्येही वाढ झाली आहे. यासाठी महापालिकेला ५३ लाख ३१ हजार रुपयांचा ढाेबळ खर्च करावा लागणार असल्याचे प्रस्तावात नमूद होते. ऑनलाईनद्वारे पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत हा एकमेव विषय असल्यामुळे याला सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली. ऑनलाईन सभेमध्ये मनपाचे प्रभारी आयुक्त डॉ. पंकज जावळे, सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, काँग्रेसचे सदस्य पराग कांबळे यांच्यासह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.