अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आठ सदस्य पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात २२ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्थायी’मधून सत्ताधारी भाजपाचे पाच सदस्य निवृत्त होणार आहेत. यादरम्यान, जुन्या चेहºयांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे संकेत भाजपमधून मिळत आहेत.शहरातील विकास कामांची गाडी रुळावर येत असल्याचे पाहून अकोलेकरांनी फेब्रुवारी २०१७ मधील महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले. मनपातील एकूण ८० नगरसेवकांपैकी ४८ नगरसेवक भाजपचे असून, निकषानुसार मनपा स्थायी समितीमध्ये सभापती पद व १६ सदस्यांपैकी १० सदस्य भाजपचे आहेत. २०१७ मध्ये स्थायी समितीपदी नगरसेवक बाळ टाले यांना संधी दिल्यानंतर २०१८ मध्ये नगरसेवक विशाल इंगळे यांना सभापदी पदाची जबाबदारी देण्यात आली. या महिन्यात ‘स्थायी’मधील १६ पैकी आठ सदस्यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने संबंधित सदस्यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. यामध्ये सत्तापक्ष भाजपमधील पाच सदस्यांचा समावेश असून, उर्वरित तीन सदस्यांमध्ये काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडीतील नगरसेवकांचा समावेश आहे. निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी मनपा प्रशासनाने २२ फेब्रुवारी रोजी महापालिकेत विशेष सभेचे आयोजन केले आहे. अर्थातच, स्थायी समितीमध्ये निवड होण्यासाठी भाजपसह इतर राजकीय पक्षांतील इच्छुक नगरसेवकांनी ‘लॉबिंग’ सुुरू केल्याची माहिती आहे.यांचा आहे समावेशआज रोजी स्थायी समितीमध्ये भाजपकडून विनोद मापारी, अनिल गरड, अर्चना मसने, शारदा खेडकर, नंदा पाटील, सेनेच्या मंजूषा शेळके, लोकशाही आघाडीच्या अॅड. धनश्री देव, काँग्रेसचे इरफान खान कायम आहेत.शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष२०१७ मध्ये स्थायी समितीत शिवसेनेच्यावतीने गटनेता राजेश मिश्रा, सपना नवले यांना संधी देण्यात आली होती. ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली असता राजेश मिश्रा यांना समितीच्या बाहेर व्हावे लागले. त्यांच्या जागेवर मंजूषा शेळके यांना संधी देण्यात आली. यंदा सपना नवले निवृत्त होणार असल्या तरी वेळप्रसंगी मंजूषा शेळके यांनाही बाहेर ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थात, त्याऐवजी पक्षातील दोन चेहºयांना संधी दिली जाण्याचे संकेत आहेत.
सभापती पद होणार रिक्तस्थायी समितीचे विद्यमान सभापती विशाल इंगळे यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. विशाल इंगळे सदस्य पदावरून निवृत्त होताच ‘स्थायी’चे सभापती पद रिक्त होणार आहे. सभापती पदावर निवड व्हावी, यासाठी भाजपमधील इच्छुकांना डोहाळे लागले आहेत. पक्षातील प्रत्येकालाच संधी मिळावी, असा पक्षश्रेष्ठींचा सूर असल्याने सभापती पदाची माळ कोणाच्या गळ््यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आठ सदस्य होतील निवृत्तविद्यमान स्थायी समितीमधून सभापती विशाल इंगळे, बाळ टाले, सुनील क्षीरसागर, सुजाता अहिर, पल्लवी मोरे, शिवसेनेच्या सपना नवले, काँग्रेसच्या शाहीन अंजूम मेहबुब खान व राकाँप्रणीत लोकशाही आघाडीच्या उषा विरक निवृत्त होत आहेत.