प्राथमिक शाळा सुरू करताना, तालुकानिहाय नियोजन करून संक्रमण आधारावर नियमित शाळा सुरू करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. तसेच शाळा सुरू केल्यानंतर ४५ दिवसांचा ब्रिज कोर्स, मागील अभ्यासक्रमावर आधारित उपक्रम व आकलन सराव वर्ग, मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाचा सर्व मुलांना सराव देण्यात यावा. तसेच आता सर्व दैनंदिन व्यवहार सुरू झाले असून, शाळा ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात याव्यात व शाळा चालू करताना गटशिक्षण अधिकारी यांना सर्व अधिकार देऊन कामकाज व नियोजन करावे तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठयपुस्तके, लेखन साहित्य द्यावे व माध्यान्ह भोजन उपलब्ध करून द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार, जिल्हा सचिव राजेश देशमुख, बाळापूर तालुकाध्यक्ष सुरेंद्र सोनटक्के, विकास राठोड, राजेश वानखडे, विनोद भिसे, सुधीर डांगे, दिनेश केकन, गोपाल भोरखडे, अवधूत वाघ, प्रसिद्धी प्रमुख सुरेश पोते, आदी उपस्थित होते.
फोटो: