शेतकऱ्याने घेतले
ब्रोकोलीचे उत्पादन
वाडेगाव : वाडेगाव येथील रामेश्वर सोनटक्के विदेशी ब्रोकोली (कोबी) चे उत्पादन घेणारे पहिले शेतकरी असून, आरोग्यासाठी लाभदायक असलेली ब्रोकोली हिरवी भाजी पाहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व कृषी अधीक्षक खोत यांनी शेतकऱ्याचे कौतुक केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी माणे, तालुका कृषी विस्तार अधिकारी काळे, कृषी सहायक बोकसे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर आदी हजर हाेते
‘दिव्यांगांना निधीचे वितरण
मूर्तिजापूर : शासन निर्देशानुसार नगर परिषदेच्या दिव्यांग साहाय्यता निधीअंतर्गत पाच टक्के निधीची २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षाकरिता ८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार नोडल अधिकारी राजेश भुगूल यांनी नगरपालिका क्षेत्रातील एकूण ३५७ दिव्यांग नागरिकांची नोंद करून २७४ पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात ६ लाख १५ हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला.
पिंजर मार्गावर गतिरोधक बसवा!’
पिंजर : पिंजर-बार्शीटाकळी मार्गावरील पिंजर टी पाॅइंटवर गतिरोधक बसविण्याची मागणी पिंजर व परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन टिटवा येथील माजी उपसरपंच सोनू जाधव यांनी दिले आहे.