लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : शहर आणि ग्रामीण भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असलेली अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्यास २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून प्रारंभ करण्यात आला आहे. मूर्तिजापूर शहरातील १५ आणि ग्रामीण भागातील १३ अनधिकृ त धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती तहसीलदार राहुल तायडे यांनी दिली आहे. मूर्तिजापूर शहरातील अनधिकृ त धार्मिक स्थळांचे वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याची सुरुवात तहसील रोडवरील जैन कीर्ती स्तंभापासून करण्यात आली. उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत तहसीलदार राहुल तायडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर, न.पा. कर्मचार्यांचा समावेश होता. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन पडघन यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण व धार्मिक स्थळे हटविण्याची ही कारवाई शहरी भागात २४ व २५ ऑक्टोबर रोजी आणि माना व कुरूम ग्रामीण क्षेत्रात २६ व २७ ऑक्टोबरदरम्यान केली जाईल. या मोहिमेत शहरातील २५ आणि ग्रामीण भागातील १३ अनधिकृ त धार्मिक स्थळे व इतर अतिक्रमणे काढली जाणार आहेत. या अनधिकृत धार्मिक स् थळांचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत शहर व ग्रामीण भागा तील जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार राहुल तायडे यांनी केले आहे.
बोरगाव मंजूसह तीन गावांत आज मोहीमबोरगाव मंजू : स्थानिक पोलीस ठाणे हद्दीत येणार्या बोरगाव मंजू येथील व ग्रामीण भागातील दोन गावांतील धार्मिक स्थळांचे अ ितक्रमणावर २५ ऑक्टोबर रोजी सकाळी गजराज चालणार आहे. याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाने संबंधित संस्थान प्रमुखांना नोटीस बजावल्या आहेत.बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्द येणार्या राष्ट्रीय महामार्गावरील व शहरातील दोन धार्मिक स्थळे हे संस्थान अनधिकृत धार्मिक अ ितक्रमणामध्ये मोडत असल्याने सदरचे अतिक्रमण निष्कासित करणे क्रमप्राप्त झाले आहे. दरम्यान, सदर अतिक्रमण संस्थान प्रमुखांनी तीन दिवसांत स्वत:हून हटविले नसल्याने शासकीय यंत्रणेमार्फत २५ ऑक्टोबर रोजी हटविण्यात येणार आहे.