रक्तदात्यांना प्रमाणपत्र व पुस्तकांची भेट
अकोटः रा.स्व.संघ अकोटच्या वतीने २७ एप्रिल हनुमान जयंतीला सरस्वती विद्यालय येथे रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरात ७५ हून अधिक जणांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी यावेळी अकोला येथील डॉ.हेडगेवार रक्तपेढी अकोला येथील चमू हजर होती, तर रक्तदान केलेल्या दात्यांना यावेळी आयोजकांतर्फे प्रमाणपत्र पुस्तके देण्यात आली.
अकोट येथे लसीकरणसाठी ऑनलाइन नोंदणी
अकोटः भाजपच्या वतीने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी, युवकांसाठी सुरू होणाऱ्या लसीकरणासंदर्भात मार्गदर्शन, ऑनलाइन नोंदणीकरिता अकोट येथे माजी गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनात नि:शुल्क लसीकरण नोंदणी व मार्गदर्शन केंद्र श्री नरसिंग महाराज मंदिर पटांगण येथे सुरू करण्यात आले. या ठिकाणी ऑनलाइन लसीकरण नोंदणी व त्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्याकरिता व्यवस्था करण्यात आलेली आहे. याप्रसंगी डॉ.अरविंद लांडे, पुरुषोत्तम चौखंडे, डॉ.गजानन महाले, प्रा.राजेंद्र पुंडकर, रवींद्र मालखेडे, मयूर आसरकर, श्रीकांत तळोकार, वासुदेव भास्कर, चंद्रकांत सुलेकिया, गौरव आसरकर, आदित्य भिसे, नागेश नेमाड़े, मितेश पांडे, सचिन जोशी, गणेश बोंडे, राजू शेळके, आनंद आसरकर, विशाल रघुवंशी, रवींद्र चौहान, चेतन देवले उपस्थित होते.
फोटो: