शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

शेतरस्त्यांची कामे सुरू करा! - पालकमंत्र्यांचे रोहयो विभागाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 1:04 PM

अकोला : आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतरस्त्यांची कामे पूर्णत: थांबविण्यात आल्याचे चित्र आहे.

अकोला : आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतरस्त्यांची कामे पूर्णत: थांबविण्यात आल्याचे चित्र आहे. हा प्रकार सर्वच तालुक्यांमध्ये घडला असून, बाळापूर तालुक्यातील कामे संबंधितांच्या निवेदनानुसार तत्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रोजगार हमी विभागाला दिले आहेत.रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात गेल्यावर्षी २०१७-१८ पासून शेतरस्ते, सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, अंतर्गत रस्ते, वृक्ष लागवड व संगोपन ही कामे सुरू आहेत. त्या कामावरील अकुशल मजुरीची रक्कम काही प्रमाणात अदा करण्यात आली, तर कुशल देयकांमध्ये गिट्टी, मुरूम, डब्बर या साहित्याची देयकांसाठी आवश्यक निधी शासनाकडून मिळालेला नाही. डिसेंबर २०१८ मध्ये सुरू असलेली अकोला जिल्ह्यातील ८७४ शेतरस्त्यांच्या कामे रखडली आहेत. शेतरस्त्यांची २५३ कामे मंजूर असताना सुरूच झालेली नाहीत. सोबतच ४७२ कामांचा प्रस्ताव तयार असताना त्याला मंजुरीही देण्यात आलेली नाही. रोजगार हमी योजनेसाठी निधीचा कमालीचा तुटवडा गत वर्षभरापासून आहे. त्याकडे केंद्र शासनासह राज्य शासनानेही कमालीचे दुर्लक्ष केले. परिणामी, शेतरस्त्यांची कामे अर्धवट राहणे, मजुरांच्या हाताला काम नसणे, साहित्याचा पुरवठा करणाऱ्यांना मोबदला न मिळण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुद्रूक ग्रामपंचायतचे उपसरपंच अजय चिंचोलकार यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांना निवेदन देत कामे सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार खिरपुरी बुद्रूक, बारलिंगा, दधम व बटवाडी या गावांमध्ये अपूर्ण असलेली कामे सुरू करण्याचे पत्र पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहे.

 

टॅग्स :Dr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलAkolaअकोला