शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

धरण क्षेत्रातील कृषी पंपांच्या जोडण्या काढण्यास सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 1:32 AM

पावसाने यावर्षी जिल्हय़ाकडे पाठ फिरविल्याने धरणात अल्प जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, हे पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्यात येत आहेत. एक तर पाऊस नाही, शेतकरी धरणाच्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असताना कृषी पंपच बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देआता पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित शेतकरी संकटात

राजरत्न सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने यावर्षी जिल्हय़ाकडे पाठ फिरविल्याने धरणात अल्प जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, हे पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्यात येत आहेत. एक तर पाऊस नाही, शेतकरी धरणाच्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असताना कृषी पंपच बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.आजमितीस ११.४४ दलघमी उपयुक्त जिवंत जलसाठा शिल्लक आहे, तसेच वाढते तापमान, बाष्पीभवन, जीर्ण जलवाहिन्यांमुळे पाण्याची नासाडी होत आहे, त्यामुळे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने काटेपूर्णा धरणासह इतर धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्याचा निर्णय घेतला असून, काटेपूर्णा धरण क्षेत्रातील जोडण्या काढण्यात सुरुवात केली आहे. जिल्हय़ातील धरणात जेमतेम जलसाठा शिल्लक असून, काटेपूर्णा धरणात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये ६.७५ दलघमी एवढा गाळ आहे. म्हणजे धरणात काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहर, औद्योगिक वसाहत, मूर्तिजापूर शहर, साठ खेडी पाणीपुरवठा योजनेला पाणी सोडले होते; परंतु पाणी नसल्याने मूर्तिजापूर शहर व साठ खेड्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, औद्योगिक वसाहतीला केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.काटेपूर्णा प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची अवस्था वाईट आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम प्रकल्पात आजमितीस केवळ 0.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १७.५३ टक्के, तर निर्गुणा प्रकल्पात ३८.0९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्हय़ातील सर्वच मोठे, मध्यम तथा लघू प्रकल्पाची स्थिती बघितल्यास केवळ २९.0५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. 

धरणात ६.७५ दलघमी गाळ!जिल्हय़ातील धरणात जेमतेम जलसाठा शिल्लक असून, काटेपूर्णा धरणात आजमितीस १७.३१ टक्के जलसाठा  उपलब्ध आहे. त्यामध्ये ६.७५ दलघमी एवढा गाळ आहे. नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संस्थेने रिमोट सेन्सिंगद्वारे काटेपूर्णा धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले असून, ६.७५ दलघमी गाळ असल्याचा या संस्थेच्या अहवालात नमूद आहे.

वान धरणाचे पाण्याचे लवकरच आरक्षण यावर्षीची धरणातील जलसाठय़ाची स्थिती बघता जिल्हय़ातील धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे, तसेच शासनाची अमृत योजनेंतर्गत वान धरणातील पाणीदेखील आरक्षित ठेवले जाणार आहे. 

शेतकर्‍यांवर संकट प्रथम प्राध्यान्य पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने या परिस्थितीत धरणातील पाणी पिकांना देता येणार नाही. त्यामुळेच धरण क्षेत्रातील कृषी पंपाच्या जोडण्या काढण्यात येत आहेत. याचा फटका शेती क्षेत्राला बसणार आहे. 

जिल्हय़ातील जलसाठय़ाची स्थिती बघता धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू  झाली आहे. काटेपूर्णा धरण क्षेत्रातील पाणी इतर कारणासाठी देण्याचे बंद करण्यात येत आहे.- जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.