बुलडाणा, दि. २४- जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने २४ जागा मिळविल्या असल्या, तरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. बहुमताकरिता भाजपला अजून आठ जागांची गरज असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.जिल्हा परिषदेचा निकाल भाजप वगळता सर्वच पक्षांसाठी धक्कादायक ठरला. भाजप वगळता एकाही पक्षाच्या जागा वाढल्या नसून, कमी झाल्या आहेत. बुलडाणा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६0 असून, बहुमतासाठी ३१ सदस्य असणे आवश्यक आहे. भाजपला २४ जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी त्यांना सात सदस्यांची गरज आहे. शिवसेनेला १0 जागा मिळाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसलाही आठ जागा मिळाल्या आहेत. मात्र, भाजप अन्य कोणताही पर्याय निवडण्याऐवजी शिवसेनेचा पाठिंबा घेईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवसेनाही अनेक वर्षे विरोधात असल्यामुळे सत्तेत सहभागी होण्याकरिता आसुसली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत यावेळी भाजप व शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १३ मार्च रोजी संपत असल्यामुळे त्यापूर्वी अध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच जिल्हा परिषद अध्यक्ष पद ओबीसी महिलाकरिता आरक्षित झाले आहे. त्यामुळे आरक्षण लक्षात घेऊनच अनेक ओबीसी महिलांनी निवडणूक लढविली. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी झालेल्या ओबीसी महिलांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले आहे. जिल्हा परिषदेत भाजपच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या ओबीसी महिला सदस्यांची अध्यक्ष पद मिळविण्याकरिता रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपकडून श्वेता महाले, मालूबाई मानकर, रूपाली काळपांडे, जयश्री टिकार, उमाताई तायडे या ओबीसी महिला विजयी झाल्या आहेत. गड आला पण सिंह गेला!गुरुवारी पार पडलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेत सातपैकी सात जागांवर यश संपादन करता आले. त्याचवेळी पंचायत समितीवरदेखील भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. मात्र, त्याचवेळी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते शांताराम बोधे हे पंचायत समिती गटात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भाजपची अवस्था ह्यगड आला पण सिंह गेलाह्ण अशी झाल्याची चर्चा दिवसभर जिल्हात होती. असाही योगायोग!नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी ह्यमानकरह्ण या नावानेच म्हणजेच प्रभाग क्रमांक १ मधील भाग्यश्री विक्रम मानकर यांच्यापासून भाजपच्या विजयाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपच्या विजयाची सुरुवात मानकर याच नावाने झाली. जिल्हा परिषद गटात मालुबाई ज्ञानदेवराव मानकर या सर्वप्रथम विजयी झाल्या. पालिकेत भाग्यश्री यांच्यामुळे, तर जिल्हा परिषदेत मालुबाई यांच्या रुपाने भाजपला ह्यपरिवर्तनाह्णचा ह्यमानह्ण मिळाल्याची चर्चा आहे.
सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू
By admin | Published: February 25, 2017 2:16 AM