शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

वाळू साठ्यांची राज्य पर्यावरण समितीने केली विचारणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 2:09 PM

अकोला: राज्यात रखडलेली वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी नद्यांमधील वाळू घाटांत उपलब्ध वाळू साठा, वाळू घाटांचे नकाशे व घाटांच्या खोलीबाबत विचारणा करीत, यासंदर्भात संबंधित मुद्यांची माहिती २८ जानेवारीपर्यंत ‘आॅनलाइन’ सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरण समितीमार्फत राज्यातील जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत

- संतोष येलकरअकोला: राज्यात रखडलेली वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी नद्यांमधील वाळू घाटांत उपलब्ध वाळू साठा, वाळू घाटांचे नकाशे व घाटांच्या खोलीबाबत विचारणा करीत, यासंदर्भात संबंधित मुद्यांची माहिती २८ जानेवारीपर्यंत ‘आॅनलाइन’ सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरण समितीमार्फत राज्यातील जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.राष्ट्रीय हरित लवादाच्या ११ डिसेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांसंदर्भात पर्यावरण विभागाने गत १५ जानेवारी २०१६ रोजी काढलेली अधिसूचना निलंबित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हास्तरीय पर्यावरण समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली आहे. त्यानुषंगाने वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नद्यांमध्ये उपलब्ध वाळू साठा, वाळू साठ्याचे पुनर्भरण, वाळू घाटांचे नकाशे व वाळू घाटांची खोली यासंदर्भात विचारणा करीत, संबंधित मुद्यांची माहिती २८ जानेवारीपर्यंत आॅनलाइन सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरण समितीने राज्यातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकाºयांना दिले. त्यानुसार वाळू घाटांसंदर्भात संबंधित मुद्यांची माहिती तयार करून राज्य पर्यावरण समितीकडे पाठविण्याची प्रक्रिया जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयांकडून सुरू करण्यात आली आहे.‘या’ मुद्यांची मागितली माहिती!

  • -वाळू घाटांचे सर्व्हे नंबर, गट नंबर व वाळू घाटांच्या भौगोलिक स्थानांचे अक्षांश-रेखांशासह वाळू घाटांची माहिती.
  • -नदीतील पाणी वापराचे प्रमाण, वाळू घाटात पोहोचण्याचा मार्ग, पर्यावरण व्यवस्थापन व त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी.
  • -नदीचे नाव, उपलब्ध वाळू साठा, वाळू साठ्याचे पुनर्भरण, नकाशे, वाळू साठ्याची खोली.
  • -वाळू घाटांसंदर्भात आक्षेप असल्यास त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही.
  • -वाळू घाटांचा खाणकाम आराखडा व खाण बंद करण्याबाबतचा आराखडा.
  • -प्रस्तावित वाळू उत्खननामुळे सभोवतालच्या पर्यावरणावर होणारे परिणाम.

 

राज्य पर्यावरण समिती आणि अपर मुख्य सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार वाळू घाटांसंदर्भात संबंधित मुद्यांची परिपूर्ण माहिती लवकरच आॅनलाइन राज्य पर्यावरण समितीकडे सादर करण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू