नंदकिशोर नारे/ वाशिम : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या टंकलेखन परीक्षेत एका बोगस परीक्षार्थ्याने तीन विद्यार्थ्यांच्या नावावर परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार ह्यलोकमतह्णने ५ डिसेंबर रोजी स्टिंग ऑपरेशनमधून उघड केला होता. या वृत्ताची दखल पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेद्वारे घेण्यात आली असून, याप्रकरणी वाशिम जिल्हा परिषद शिक्षण विभागाला खुलासा मागविला आहे.जिल्हय़ातील वाशिम, कारंजा, मंगरुळपीर व मालेगाव येथील एकूण ६ केंद्रांवर २ डिसेंबरपासून सकाळी ९ ते ४ यावेळेत टंकलेखन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जिल्हय़ातील परीक्षा केंद्रांवर ६ हजार ५२२ परीक्षार्थ्यांचा सहभाग होता. वाशिम शहरातील तीनही परीक्षा केंद्रांवर मूळ परीक्षार्थ्यांच्या जागेवर बसून बोगस परीक्षार्थ्यांंनी पे पर सोडविले. असेच प्रकार जिल्हय़ातील इतरही केंद्रांवर झाले असल्याची माहिती आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सदर परीक्षेबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या वतीने मागविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने वाशिम शहरातील तीनही केंद्रांवरील केंद्रप्रमुखांना नोटीस देण्यात आली असून, त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. केंद्रप्रमुखांकडून प्राप्त खुलासा पुणे येथे मंगळवार ८ डिसेंबर रोजी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य परीक्षा परिषद यासंदर्भात पुढील कारवाई करणार आहे.जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर नारायण गोटे यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. टंकलेखन परीक्षेतील गैरप्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.*लोकमतचे सर्वत्र कौतुकटंकलेखन परीक्षेमध्ये होत असलेला गैरप्रकार अनेकांना माहीत असला तरी, त्यावर कोणीही प्रकाश टाकत नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. लोकमतने स्टिंग ऑपरेशनद्वारा टंकलेखन परीक्षेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आणल्याने सर्व स्तरातून लोकमतचे कौतुक होत आहे. या वृत्तामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण सभापतींनी आक्रमक होऊन चौकशीची मागणी केली.
राज्य परीक्षा परिषदेने मागविला खुलासा!
By admin | Published: December 08, 2015 2:27 AM