शहरातील सिंधी कॅम्प परिसराजवळ नगर परिषद मुख्याधिकारी यांचे निवासस्थान आहे. तसेच या निवासस्थानाला लागूनच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी कोणीही हजर नव्हते. मुख्याधिकारी निवासस्थान अनेक वर्षांपासून खाली पडलेले आहे, तर उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय कुलूपबंद होते. या परिसरातच नगर परिषदचे सार्वजनिक वाचनालय तथा काही न.पा. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री या परिसरात धगधगत्या आगीचे लोळ दिसल्याने परिसरातील नागरिकांनी लक्ष दिले. तत्काळ अग्निशमन दल बोलावण्यात आले; परंतु आधीच उशिरा आलेल्या अग्निशमन दलाची यंत्रे व्यवस्थित नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. दरम्यान, आगीने चांगलाच पेट घेतला होता. घटनास्थळी पोलीस, महसूल तथा नगर परिषदेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. वृत्त लिहीस्तोवर आगीचे कारण कळू शकले नाही.
राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:35 AM