- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: नासिक, पुणे आणि मुंबई विभागाने राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा-२०१९-२० वर पहिल्या फेरीपासूनच दबदबा निर्माण केला होता. अंतिम लढतींमध्येदेखील या तिन्ही विभागाने आघाडी घेऊन विविध गटात जेतेपद पटकावले. स्पर्धेचा समारोप गुरुवारी वसंत देसाई क्रीडांगण बहूद्देशीय सभागृहात पार पडला.या स्पर्धेत १४ वर्षांआतील मुलांच्या गटात फ्रावशी अकादमीने प्रतिनिधित्व करीत नाशिक विभागाला विजय मिळवून दिला. उपविजेतेपद क्वीन्स स्कूल परभणी औरंगाबाद विभागाने मिळविले. तृतीयस्थानी मुंबई विभागातील आॅक्सफर्ड पब्लिक स्कूल कांदीवली संघ राहिला. मुलींच्या गटात पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी संघाने विजेतेपद पटकावले. नाशिक विभागातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूल संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तृतीयस्थान नागपूरच्या भवन्स बीपी विद्यामंदिर संघाने मिळविले.१७ वर्षांआतील मुलांच्या गटात एचपीटीआरवायके नाशिक प्रथम, सेंटर पॉइंट स्कूल काटोल रोड नागपूर संघ द्वितीय आणि शुभम राजे कनिष्ठ महाविद्यालय मुंबई संघाने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये जमनाबाई नरसो स्कूल मुंबई, महावीर विद्यालय कोल्हापूर, मॉडर्न स्कूल कोराडी रोड नागपूर संघाने अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. १९ वर्षाआतील मुलांच्या गटात शुभम राजे कनिष्ठ महाविद्यालय संघाने बीएमसीसी पुणे संघावर मात करू न जेतेपद पटकावले. डीकेटीई इंग्लिश माध्यमिक हायस्कूल कोल्हापूर संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. मुलींच्या गटात बीएमसीसी पुणे संघाने डीएव्ही पब्लिक स्कूल नेरू ड मुंबई संघाचा पराभव करू न विजेतेपद मिळविले. एलएडी महाविद्यालय शंकर नगर नागपूर संघाने तृतीय स्थान मिळविले. स्पर्धेत पंच म्हणून तुषार देशमुख, सचिन राऊत, कलीमुद्दीन यांनी काम पाहिले. स्पर्धेत एकूण २८८ खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये ५६ लढती खेळविण्यात आल्या.
महाराष्ट्र संघ होणार घोषित!या स्पर्धेतून राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात येणार आहे. १४ वर्षांआतील मुले व मुलींचा संघ नोएडा (उत्तर प्रदेश), १७ वर्षांआतील गट छिंदवाडा (मध्य प्रदेश), १९ वर्षांआतील गट संघ पुणे (महाराष्ट्र) येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्र संघाची निवड चाचणीतील लढती गुरुवारी सायंकाळी आणि शुक्रवारी सकाळच्या सत्रात घेण्यात येणार आहेत. थेट निवड चाचणीकरिता १४६ मुले व मुली अकोल्यात दाखल झाले आहेत.
स्पर्धेचा समारोपक्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व अकोला जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचा समारोप गुरुवारी वसंत देसाई क्रीडांगण बहूद्देशीय सभागृह येथे पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्याधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, डॉ. गजानन नारे, सय्यद जावेद अली, प्रभाकर रुमाले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेता, उपविजेता आणि तृतीय क्रमांकाच्या संघाला चषक व पदक प्रदान करण्यात आले. जावेद अली यांच्यावतीने खेळाडूंना बॅडमिंटन शुज बक्षीस देण्यात आले. यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन राजकुमार तडस यांनी केले. कार्यक्रमाला बॅडमिंटन संघटनेचे निषाद डिवरे, सचिन राऊत, मंगेश देशपांडे, क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, चारुदत्त नाकट, वैशाली इंगळे, दिनकर उजळे, सतीश भट्ट, प्रशांत खापरकर, राजू उगवेकर, निशांत वानखडे व धीरज चव्हाण उपस्थित होते.