अकोला : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे २४ नोव्हेंबरपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथेसहावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या राज्यस्तरीय संमलेनात राष्ट्रसंताच्या विचारांचा जागर होणार असूनसंमेलन स्थळाला आद्य किर्तनकार आमले महाराज साहित्य नगरी व दुर्गादास रक्षक सभागृह असे नाव देण्यात आले, अशी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी दिली.दोन दिवसीय संमेलनानिमित्त रविवारीसुरुवात २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता सामुदायिक ध्यान व चिंतनाने होणार आहे, यानंतर श्री गुरुदेव बालभजन मंडळ बेलखेड यांचे खंजेरीभजन यानंतर चंद्रशेखर चतारे व अनिल अडगणे यांच्या संयोजनात सामुदायिक प्रार्थना मंडळाची स्पर्धा पार पडणार आहे. संमेलनाला अध्यक्षम्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. जावेदजी पाशा कुरेशी हे राहणार आहेत. ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांची निवड उद्घाटन सत्रात भजनसम्राट रामभाऊ गाडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ग्रामगिता जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ प्रचारक गजानन चिंचोळकार व सुनील देशमुख यांना देऊन गौरविण्यात येईल. राष्ट्रसंतांचे आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांचे वाचन व सादरीकरण डॉ. राजीव बोरकर यांच्या संयोजनात पार पडेल. या संमेलनाचा समारोप सायंकाळी ५ वाजता होईल. या समारोपीय सत्राला संमेलनाध्यक्ष प्रा. जावेदजी पाशा कुरेशी, स्वागताध्यक्ष अनिल गावंडे, विशेष उपस्थिती डॉ. रणजित पाटील, आचार्य वेरुळकर गुुरुजी, डॉ. विघे गुरुजी, किर्तनकार महादेव भुईभार, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधिर सावरकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, ज्ञानेश्वर रक्षक, मुगुटराव बेले, आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष अनिल गावंडे, बहुजन पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील, अॅड. सुधाकर खुमकर, सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट, धनंजय मिश्रा, अॅड. संतोष भोरे, गोपाल गाडगे, ज्ञानेश्वर साखरकर, श्रीपाद खेळकर, राजेंद्र झामरे, प्रमोद शेंडे, डॉ. राजीव बोरकर, दिलीप कराळे, शिवा महल्ले, स्वप्निल अहिर, आकाश हरणे, नंदकिशोर डंबाळे, श्रीकृष्ण ठोंबरे, तुषार बरगट आदींसह सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.