अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने व विदर्भ कॅरम असोसिएशन, अकोला यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा-२0१५ चे आयोजन संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे केले होते. चार दिवसीय या स्पर्धेचा समारोप रविवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या विशेष उपस्थितीत दुपारच्या सत्रात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी क्रीडा राज्यमंत्री खान मो. अजहर हुसैन होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा परिषद सदस्य सय्यद जावेद अली, ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष प्रभजितसिंह बछेर, फेडरेशनचे मीडिया डायरेक्टर संदीप पुंडकर, आंतरराष्ट्रीय पंच जनार्दन संगम, आंतरराष्ट्रीय पंच विकास मुकादम, विदर्भ कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मो. इकबाल, सेवानवृत्त क्रीडा उपसंचालक रमेश पोशमपेल्लूम्, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काळे, सचिव प्रमोद वानखडे, महानगर अध्यक्ष किशोर पाटील, सचिव राजेंद्र जळमकर, बुलडाणा जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष छतवाल उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत शेखर पाटील व रवींद्र धारपवार यांनी केले. प्रास्ताविक शेखर पाटील यांनी करू न, राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे सुंदर, नेटके आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल स्पर्धेतील सहभागी खेळाडूंच्या पालकांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राज्यस्तर शालेय कॅरम स्पर्धेचा समारोप
By admin | Published: December 07, 2015 2:39 AM