शेगाव (जि. बुलडाणा), दि. २- येथील श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघाच्यावतीने रविवारी सीताफळ कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत १३00 शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय धोत्रे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार अँड. आकाश फुंडकर, विजय कोलते, एस. एल. जाधव, श्याम गट्टाणी यांची उ पस्थिती होती. यावेळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. रविप्रकाश दाणी, डॉ.शिवाजी संवेद, डी.वी. जळे, डॉ.लाहोटी, डॉ. डी.एन. कुळकर्णी, डॉ. प्रदीप बोरकर यांनी सीताफळ प्रक्रिया व विक्री व्यवस्थापन लागवड या विषयावर उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. अखिल महाराष्ट्र सीताफळ प्रशिक्षण व संशोधन संघाच्यावतीने शे तकर्यांना विशेष कीट व सीताफळ मार्गदर्शन पुस्तके भेट देण्यात आली. सीताफळ कार्यशाळा व प्रदर्शनाला राष्ट्रीय फलोत्पादन पुणे, कृषी विद्यापीठ अकोला, परभणी, राहुरी व श्री गजानन महाराज संस्थान यांचे सहकार्य लाभले.
शेगावात राज्यस्तरीय सीताफळ कार्यशाळा
By admin | Published: October 03, 2016 2:50 AM