अकोला: नागपुर येथे १७ ते १९ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संयुक्तरित्या सहभागी झालेल्या अकोला- अमरावती परिमंडळाला वयक्तिकमध्ये २ आणि सांघिक गटात १ असे एकून ३ सुवर्ण, तर वैयक्तिकमध्ये ३ आणि सांघिक गटात १ एकून ४ रजत पदक मिळवत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत एकून ७ पदके मिळविण्यात यश आले.महावितरण यवतमाळ जिल्हयातील पुसद विभागात तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असणारे विनोद गायकवाड यांनी कुस्तीच्या ६१ किलो वजनी गटात कुच करत अमरावती-अकोला परिमंडळाला पहिले स्वर्ण पदक मिळऊन दिले. सहाय्यक अभियंता यवतमाळ विभाग स्नेहल बडे यांनी टेबल टेनिस मध्ये दुसरे स्वर्ण पदक मिळवून दिले. याशिवाय सांघिक टेबल टेनिसच्या खेळात वर्चस्व गाजवत अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाग्यश्री देशमुख (अमरावती प्रशिक्षण केंद्र), उपकार्यकारी अभियंता मनिषा बुरांडे यवतमाळ ,सहाय्यक अभियंता कोमल पुरोहीत (अकोला),सहाय्यक अभियंता स्नेहल बडे यांनी स्वर्ण पदक पटकावले. बॅडमिंटन दुहेरी खुल्या गटात (सहाय्यक अभियंता,अकोला) शरद भोसले, किशोर धाबेकर (तंत्रज्ञ अकोला ), कुस्ती (९२ किलो )- हसुन्ननोदीन शेख(निम्नस्तर लिपीक मलकापुर), भाला फेक - मेघा राठोड (निम्नस्तर लिपीक अमरावती), शुभम मात्रे (शिपाई वाशिम) यांना ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रजक पदावर समाधान मानावे लागले. रवी नगर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर तीन दिवसीय आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या .या स्पर्धेत सांघिक संघाने (भांडुप ,रत्नागिरी परिमंडल) सर्वच खेळप्रकारात वर्चस्व गाजवून सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळविला. महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांच्याहस्ते विजेत्या संघाला करंडक प्रदान करण्यात आला. यजमान नागपूर (गोंदिया- चंद्रपूर) संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद जाहीर करण्यात आले. राज्यातील १६ परिमंडलाचे औरंगाबाद (जळगाव), लातूर (नांदेड), कल्याण (नाशिक), सांघिक कार्यालय (भांडूप व रत्नागिरी), नागपूर (चंद्पूर व गोंदिया), अकोला (अमरावती), पुणे (बारामती) व कोल्हापूर अशा ८ संयुक्त संघांतील ६८८ पुरुष व ३७६ महिला असे एकूण -१०६४ खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते.