अँड. नीलिमा शिंगणे / अकोला : पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर योगामय झाला होता. पहाटेपासूनच अकोलेकर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील पीडीकेव्हीच्या दीक्षांत समारंभ सभागृहाकडे वाट धरली होती. ३३00 नागरिकांनी जिल्हास्तर मुख्य कार्यक्रमात योगाभ्यास करीत ह्यस्टे फि ट.. स्टे हॅपी.. अँन्ड स्टे हेल्दीह्ण असा संदेश दिला. चिमुकल्या गार्गी भगत ते वयोवृद्ध अनंत इंगळे या सर्व सहभागी योगपटूंनी रविवार, २१ जून रोजी २१ आसनं केली. संगच्छध्वम् संवद्यध्वमसंवो मनासी जानताम्।देवाभागम् यथा पूर्वेसंजानना उपासते।। या श्लोकाने आसनांना प्रारंभ करण्यात आला. वॉर्मअप नंतर उभ्याने करण्यात येणारे ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन करण्यात आले. बैठय़ा स्थितीमधील भद्रासन, शशांकासन, अर्धउष्ट्रासन, वक्रासन यानंतर पोटावर झोपण्याच्या स्थितीमधील भुजंगासन, शलभासन, मकरासन, पाठीवर झोपलेल्या स्थितीमधील सेतूबंध सर्वांगासन, पवन मुक्तासन, शवासन करण्यात आले. चौथ्या भागामध्ये कपालभाती आणि त्यानंतर प्राणायाम नाडीशोधन, भ्रामरी प्राणायाम आणि सर्वात शेवटी शांभवी व ज्ञानमुद्रा करण्यात आली. यावेळी सुरू असलेल्या हळुवार पार्श्वसंगीतामुळे वातावरण अधिकच आल्हाददायक झाले होते. विश्वामध्ये एकता आणि शांतता नांदण्यासाठी नियमित योगाभ्यास करण्याचा सर्वांकडून संकल्प वदवून घेण्यात आला. यानंतरच्या हास्ययोगामुळे हजारो नागरिकांच्या खद्खद्ण्याने सभागृह दणाणून गेले होते.सर्वे भवन्तु सुखिन:सर्वे सन्तु निरामया:।सर्वे भद्राणी पश्यन्तुमा कश्चिद्दु: खभाग्भवेत्।। या श्लोकाने सांगता झाली.
स्टे फिट..स्टे हॅपी.. अँन्ड स्टे हेल्दी
By admin | Published: June 22, 2015 2:25 AM