अकोला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांगळुद येथून येथील एका घरातून प्रतिबंधित असलेल्या अमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्षाने छापा टाकून गांजाचा साठा जप्त केला.
सांगळुद येथील रहिवासी अविनाश गजानन मोकळकार वय ३५ वर्षे हा त्याच्या राहत्या घरातून प्रतिबंधित असलेल्या गांजाची अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह पाळत ठेवून गांजा विक्री करीत असताना अविनाश मोकळकार यास रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात यांनी एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या कक्षाने केली.