लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाटे क्लब परिसरातील इराणी झोपट्टीत राहणारा मुस्तफा अली अख्तर अली याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील २0९ गॅ्रम सोने व २00 गॅ्रम चांदीचे दागिने जप्त केले. कोतवाली पोलिसांनी मुस्तफा अलीविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना भाटे क्लब येथे एक इसम संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. त्याने त्याचे नाव मुस्तफा अली असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे प्लास्टिकची पिशवी आढळून आली. त्यात सोने-चांदीचे दागिने असे एकूण २0९ गॅ्रम सोने व २00 गॅ्रम चांदी असल्याचे आढळून आले. या सोने-चांदीची किंमत एकूण ४ लाख ५0 हजार रुपये आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे यांनी केली.
चोरीचे २0९ ग्रॅम सोने घेऊन जाणार्या युवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:32 IST