अकोला , दि. १९- खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतून शनिवारी चोरीस गेलेल्या कारचा छडा २४ तासाच्या आत लावण्यात खदान पोलिसांना यश आले. सदर चोरीस गेलेली कार खदान पोलिसांनी बाळापूर येथून ताब्यात घेतली आहे. अकोल्यातील रहिवासी रवी प्रभाकर दुबे यांची एम ए २- वाय ४८१६ ही कार लंपास झाली होती. या प्रकरणाची तक्रार दुबे यांनी खदान पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारचा शोध सुरू केला. रविवारी खदान पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ही कार ताब्यात घेतली. सदर कार एका ठिकाणी उभी करण्यात आली होती, त्यामुळे सदर कार कुणी चोरी केली, यासंदर्भात माहिती मिळाली नाही. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात जमादार तारासिंग राठोड, शरद बुंदे, प्रदीप पवार, गिरीश खडके यांनी केली. मिळालेल्या अवघ्या चोवीस तासाच्या आत कार पोलिसांनी शोधून काढली.
चोरीस गेलेल्या कारचा छडा!
By admin | Published: March 20, 2017 2:47 AM