- सचिन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीतील सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार हा राजकुमार वर्मा यांच्या दुकानात नव्हे, तर सराफ बाजारातील बटुकलाल यांच्या खानावळीसमोर झाल्याचे तपासात समोर असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. ज्या दिवशी सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला नेमके त्याच दिवशी वर्मा यांच्या दुकानातील सीसी कॅमेरे बंद असल्यामुळे नेमके तपासावे तरी काय, असा सवालही पोलिसांनी उपस्थित केला.खदान पोलिसांनी अटक केलेल्या दोन चोरट्यांच्या चौकशीत, त्यांनी चोरीतील सोने सराफ असोसिएशनचे महानगराध्यक्ष राजू वर्मा यांना विकल्याचे समोर आल्यानंतरच पोलिसांनी वर्मा यांच्याकडून ९० ग्रॅम सोने जप्त केल्याची माहिती, खदानचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी दिली. चोरीच्या सोन्याची खरेदी-विक्री करताना सराफ त्यांच्या दुकानात व्यवहार करीत नाहीत. अशा प्रकारचे व्यवहार सराफ बाजारात असलेल्या खाणावळीसमोर होत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे, असे जाधव यांनी सांगितले.
नेमके त्याच दिवशी सीसी कॅमेरे बंद का?चोरीचे सोने खरेदी करण्याचा हा व्यवहार २८ नोव्हेंबर रोजी झाला. नेमके त्याच दिवशी राजू वर्मा यांच्या दुकानातील सीसी कॅमेरे बंद होते. त्यामुळे सीसी कॅमेरे तपासले नाहीत, अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सीसी कॅमेरे बंद असल्याचे वर्मा यांनीच पोलिसांना सांगितल्याचे समजते. दुसऱ्या एका दुकानात तपासणी सुरू असताना चोरट्याने तेथील तीन सराफांवर आरोप केले नाहीत; मात्र वर्मा यांनाच सोने विक्री के ल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानुसारच ९० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
‘डिटेक्शन’ सुरू होताच सराफ संतापले! गत काही दिवसात खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० पेक्षा अधिक चोºया झाल्या आहेत. आतापर्यंत या चोऱ्यांचा तपास थंड बस्त्यात होता; मात्र खदान पोलिसांनी चोरांच्या एक टोळीस अटक करताच, त्यांनी सोने ज्या सराफांना विकले त्यांचे पितळ उघडे पाडणे सुरू केले आहे. बहुतांश चोºयातील विक्री झालेले सोने आता ज्या सराफांकडे आहे, त्यांच्यावर कारवाई होण्याची चिन्हे दिसतानाच सराफ संतापले असून, त्यांनी उलट आरोप सुरू केल्याचे खदान पोलिसांचे म्हणणे आहे.