आपण टॅक्स भरता का?
कामगार : महिनाकाठी आठ ते दहा हजार रुपयांची कमाई होते. त्यामुळे मी कर भरत नाही.
ऑटो चालक : घर कर व इतर कर भरले, परंतु, इन्कम टॅक्स आजपर्यंत भरला नाही.
भाजीपाला विक्रेता : इन्कम टॅक्स कधी भरला नाही, पण महापालिका व इतर कर मात्र नियमित भरतो.
फेरीवाला : दिवसभर मेहनत घेतल्यानंतरही पोट भरेल एवढीच कमाई होते, कर कुठून भरणार ?
सिक्युरिटी गार्ड : महिन्याच्या अखेरपर्यंत पगार पुरत नाही. कर भरण्याचा प्रश्नच येत नाही.
सफाई कामगार : कर भरण्याएवढी कमाई तर झाली पाहिजे, आजपर्यंत कधी कर भरलाच नाही.
सलून चालक : आर्थिक व्यवहार सुरळीत असावे म्हणून, इन्कम टॅक्स भरावा लागतो.
लॉन्ड्री चालक : दुकानाचा कर व घराचा कर नियमित भरतो, प्राप्ती कर कधी भरला नाही.
घर काम करणाऱ्या महिला : कर कशाला म्हणतात हेच माहीत नाही.
प्रत्येकजण टॅक्स भरतो
उच्च उत्पन्न गट व नोकरदार वर्ग प्राप्ती कर भरतो. सामान्य जनता मात्र अप्रत्यक्ष कर भरतच असते. एखादी वस्तू खरेदी केली किंवा सेवेचा उपभोग घेतला, तर त्यावर असलेला जीएसटी ती वस्तू किंवा सेवा घेणाऱ्याच्या खिशातूनच वसूल केली जाते. ही अप्रत्यक्ष कर वसुली आहे. पेट्रोल व डिझेलवरील करही अप्रत्यक्षपणे प्रत्येकाला भरावाच लागतो. देशातील प्रत्येक नागरिक सरकारच्या तिजोरीत भर घालतच असताे.
- प्रसन्नजीत गवई, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, सीताबाई कला महाविद्यालय, अकोला