शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

भाजपाला थांबविण्याचे काँग्रेस, वंचितसमोर आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:50 PM

येत्या निवडणुकीत भाजपाने वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीसमोर या मतदारसंघात तगडे आव्हान उभे केले आहे.

- राजेश शेगोकार  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावातही अकोला पूर्व या मतदारसंघात भाजपाचा अवघ्या २ हजार ४४० मतांनी विजय झाला होता. या निसटत्या विजयानंतर भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी या मतदारसंघाची मजबूत बांधणी केली व भाजपाचा जनाधार मजबूत केल्याचे चित्र त्यानंतरच्या कालावधीत समोर आले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाने वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीसमोर या मतदारसंघात तगडे आव्हान उभे केले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी काँग्रेसकडूनही मोर्चेबांधणी सुरू असून, वंचित बहुजन आघाडीची बदलती समीकरणे लक्षात घेता या पक्षामध्ये दावेदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आगामी निवडणूक रंगतदार ठरेल.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत भारिप-बमसंचे हरिदास भदे यांनी या मतदारसंघात मिळविलेला विजय २०१४ मध्ये कायम ठेवता आला नाही. भाजपाचे रणधीर सावरकर यांनी भदे यांच्यावर विजय मिळवित भगवा फडकविला. या विजयानंतर आ. सावरकर यांनी मतदारसंघात भाजपा मजबूत केल्यामुळेच अकोला शहराच्या हद्दवाढीमध्ये सहभागी झालेल्या प्रभागांमध्ये महापािलकेच्या निवडणुकीत कमळ फुलले. या यशाचे श्रेय साहजिकच आ. सावरकर यांना जात असल्याने त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे साहजिकच पक्षातूनही त्यांच्या उमेदवारीला स्पर्धक निर्माण झालेला नाही. भाजपाने निर्माण केलेले हेच आव्हान मोडून काढण्यासाठी सर्वच विरोधकांना मोठी कसरत करावी लागेल असेच चित्र सध्या आहे.शिवसेनेलाही हवा मतदारसंघबोरगाव मंजू हा मतदारसंघ असल्यापासून या मतदारसंघातून युतीमध्ये शिवसेनेनेच लढत दिली आहे. २०१४ मध्ये सेना-भाजपा स्वतंत्र लढल्यावर या मतदारसंघात भाजपाने विजय मिळविला, त्यामुळे आता शिवसेनेचा या मतदारसंघावरील दावा संपला असल्याचे मानले जात आहे; मात्र राजकारणात काहीही होऊ शकते या विधानावर विश्वास असल्याने युतीमध्ये शिवसेना पाचपैकी दोन मतदारसंघावर दावा कायम ठेवून आहे. त्यामध्ये अकोला पूर्वचाही पर्याय खुला आहे. शिवसेनेत आमदार गोपीकिशन बाजोरिया, श्रीरंगदादा पिंजरकर, गोपाल दातकर, अ‍ॅड. अनिल काळे, ज्योत्स्ना चोरे, मुकेश मुरमकार असे अनेक दावेदार आहेत.

‘वंचित’मध्ये वाढले दावेदार

अकोला पूर्व या मतदारसंघाच्या निर्मितीपूर्वी हा मतदारसंघ बोरगाव मंजू या नावाने होता. त्यावेळी १९९९, २००४ मध्ये व अकोला पूर्वच्या निर्मितीनंतर २००९ मध्ये अशा तिन्ही निवडणुकांमध्ये भारिप-बमसंने विजय मिळवून या मतदारसंघाला ‘गड’ निर्माण केला होता. २०१४ मध्ये अवघ्या २ हजारावर मतांनी हा गड पडला, त्यामुळे येथील जनाधार लक्षात घेता भारिप-बमसंचे नवे स्वरूप असलेल्या वंचित आघाडीकडे उमेदवारीसाठी दावेदार वाढले आहेत. माजी.आ. हरिदास भदे, जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे, माजी मंत्री डॉ.डी.एम.भांडे, बालमुकुंद भिरड, दामोदर जगताप, ज्ञानेश्वर सुलताने, शंकरराव इंगळे अशी मोठी स्पर्धा आहे. 

काँग्रेस, राष्टÑवादीत इच्छुकांना वेध आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. २०१४ मध्ये येथे राष्टÑवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले होते. यावेळी काँग्रेसला अवघी ५.६६ तर राष्टÑवादीला ३.६१ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेससमोर आता भाजपासह वंचितचे आव्हान आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून दादाराव मते पाटील, डॉ. सुभाष कोरपे, अजाबराव ताले, पुरुषोत्तम दातकर आदी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर तांत्रिक कारणांमुळे लोकसभेची उमेदवारी हुकलेले डॉ. अभय पाटील हेसुद्धा या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार होऊ शकतात, अशीही चर्चा आहे. दुसरीकडे राष्टÑवादी काँग्रेसही या मतदारसंघात चाचपणी करत असून, हा मतदारसंघ मिळालाच तर राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासह शिरीश धोत्रे, श्रीकांत पिसे यांची नावे चर्चेत आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी