सध्या सुरु असलेल्या विशेष गाड्या
०२१०५ मुंबई - गोंदिया
०२११ मुंबई - अमरावती
०१०३९ कोल्हापूर - गोंदिया
०२८०९ मुंबई - हावडा
०२१६९ मुंबई - नागपूर
०२८३३ अहमदाबाद - हावडा
अधिक भाडे कधीपर्यंत सहन करणार
अकोल्याहून नागपूर मार्गावर ३७ किमी अंतरावर असलेल्या मूर्तिजापूर पर्यंत शयनयान श्रेणीतून प्रवास करण्यासाठी नागपूर एवढे, अर्थात १७५ रुपयांचे आरक्षित तिकीट घ्यावे लागते. अकोल्याहून मुंबई मार्गावर ३७ किमी अंतरावर असलेल्या शेगावपर्यंत शयनयान श्रेणीतून प्रवास करण्यासाठी भुसावळ एवढे अर्थात १७५ रुपये भाडे द्यावे लागत आहे. या दोन्ही गंतव्य स्थळापर्यंत २ एस श्रेणीच्या डब्यातून प्रवास करण्यासाठी ६० रुपये मोजावे लागतात. पूर्वी हेच डबे जनरल श्रेणीचे होते, त्यावेळी यासाठी ४५ रुपये तिकीट होते.
जनरल डबे कधी ‘अनलॉक’ होणार?
कोरोनाकाळापूर्वी सर्वच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सामान्य प्रवाशांसाठी जनरल डबे होते. आता विशेष गाड्यांमध्ये जनरल डब्यांचे रुपांतर २ एस श्रेणीत करण्यात आले असून, यासाठी आरक्षित तिकीट घ्यावे लागत आहे. दक्षिण -मध्य रेल्वेच्या काचिगुडा-अकोला या एक्स्प्रेस गाडीमध्ये जनरल डबे खुले करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या एकाही गाडीमध्ये ही सुविधा अद्याप सुरु झालेली नाही.
‘स्पेशल’ भाडे कसे परवडणार?
कोरोना काळात आधीच रोजगार बुडाला असून, महागाई प्रचंड वाढली आहे. आता रेल्वेत प्रवासासाठीही जास्त पैसे मोजावे लागत आहे. एखाद्या वेळी प्रवास करणाऱ्यांचे ठिक आहे. परंतु, आमच्यासारख्या दररोज प्रवास करणाऱ्यांना हे स्पेशल भाडे परवडत नाही.
- संजय ताथोड, एक प्रवासी
रोजगारानिमित्त मी दररोज मूर्तिजापूर ते अकोला अपडाऊन करतो. पूर्वी पॅसेंजर गाडीमध्ये कमी पैशात प्रवास करता येत होता. आता विशेष गाड्यांमध्ये पासचीही सुविधा बंद आहे. जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागत असल्याने महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
- सचिन कोथळकर, एक प्रवासी