लोकमत न्यूज नेटवर्कघुसर : आमदार सावरकर यांनी १३ ऑक्टोबरला विद्युत पारेषणच्या तार ओढण्याच्या जागेला भेट देऊन तेथील सर्व परिस्थिती जाणून घेतली. यावेळी शेतकर्यांच्या सर्व पिकाप्रतीच्या भावना जाणून घेऊन विद्युत पारेषणचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत, अधीक्षक अभियंता वंदनकुमार मेंढे, कार्यकारी अभियंता गणेश देशमुख, अतिरिक्त अभियंता दिनेश शेगोकार यांना सर्व पिके निघाल्यावर कामाला सुरुवात करा, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम करावयाचे नाही, अशा प्रकारच्या सूचना दिल्या.मागील दोन दिवसात वाहनांच्या वाहतुकीमुळे ज्या शेतरस्त्यामध्ये खोल खड्डे पडले त्यामध्ये मुरूम टाकून ते पूर्ववत करून द्यावेत, असेही सुचविले. सन २0१६ च्या ऑर्डरप्रमाणे काम करू नका, अशी सूचना केली. याबद्दल आमदार रणधीर सावरकर यांचे सर्व शेतकर्यांनी आभार मानले. यामध्ये खरप येथील नामदेव पागृत, विठ्ठल पागृत, सुरेश पागृत, विष्णू पागृत, रघुनाथ इंगळे, नागोराव नागे तसेच खरप येथील शेतकरी, घुसर येथील चंदु खडसे, रामेश्वर बेहेरे, लक्ष्मण बेहेरे, रामदास कोळकर, पुंडलीक लोथे, राजेश पागृत, मनोज डहाके, संजय बेहेरे, गजानन कांगटे, गोपाल भांडे, पंकज लहरिया, कासली येथील शेतकरी तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल गावंडे, जि. प. सदस्य प्रकाश रेड्डे, सर्कलप्रमुख बाबूलाल खंडारे, रोशन पागृत आदी उपस्थित होते.
शेतकर्यांच्या विरोधाची दखलखरप येथील नामदेव पागृत यांच्या शेतामध्ये महापारेषणच्या अधिकार्यांनी पूर्वसूचना न देता विद्युत टॉवरसाठी तारा ओढण्याचे काम सुरू केले होते. तेव्हा त्यांनी अधिकार्यांना रोखून काम न थांबविल्यास संपूर्ण कुटूंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. तसेच अन्य शेतकर्यांनीही हे काम पीक निघेपर्यंत थांबविण्याची मागणी केली होती. आमदार सावकर यांनी शेतकर्यांच्या विरोधाची दखल घेऊन खरप व घुसर परिसरात काम सुरू असलेल्या जागेला १३ ऑक्टोबर रोजी भेट देऊन शेतकर्यांना दिलासा दिला.