अकोला: मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ही ऐतिहासिक वास्तू पाडण्यात आल्याचा निषेध करीत भारीप बहुजन महासंघाच्यावतीने अकोल्यातील धिंग्रा चौकात शनिवारी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. मुंबईतील दादरस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ही ऐतिहासिक वास्तू पाडण्यात आली. तसेच या वास्तूमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रिटिंग प्रेस व साहित्याची नासधूस करण्यात आली. त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यानुषंगाने या घटनेच्या निषेधार्थ भारिप बमसंच्यावतीने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. यासंदर्भात संबधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला. या आंदोलनात आमदार बळीराम सिरस्कार, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे यांच्यासह गजानन गवई, प्रतिभा अवचार, अशोक शिरसाट, सम्राट सुरवाडे, शोभा शेळके, प्रभा शिरसाट, सुभाष रौंदळे, राजूमिया देशमुख, बबलू जगताप, जीवन डिगे, श्रीकांत ढगेकर, रमेश तायडे, शालिनी गवारगुरू, संगीता खंडारे, अरुणा सिरसाट, सरला मेश्राम, सुशिला निंगोट, कोकिळा वाहुरवाघ, दामोदर जगताप, ज्योती खळे, गोपाल कोल्हे, मनोहर शेळके, अमोल शिरसाट, बुद्धरत्न इंगोले, विलास इंगोले, राजू तायडे, विकास सदांशिव, दिनकर नागे, रवी मेश्राम, महादेव शिरसाट, विजय सदांशिव, देवानंद खडे व इतर पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भारिपने केला रास्ता रोको!
By admin | Published: June 27, 2016 2:39 AM