- संजय खांडेकरअकोला : सरकी ढेपेचा साठवणूक करण्यात आल्याने ढेपेचे प्रतिक्ंिवटल दर ४००० रुपयांवर पोहोचले असून, पशुपालक आणि दूध विक्रेते पुन्हा अडचणीत सापडले आहेत.विदर्भ आणि मराठवाड्यातील सरकी ढेपीची मागणी संपूर्ण देशातून असते. देशभरातून असलेली मागणी लक्षात घेता राष्ट्रीय स्तरावरील सटोडियांनी सरकी ढेपीची साठवणूक सुरू केली. त्यामुळे जुलै २०१९ पासून सरकी ढेपीचे भाव वाढत आहे. सातत्याने वाढत असलेल्या सरकी ढेपीच्या भावामुळे पशुपालक कमालीचे त्रासले आहे. सरकी ढेपीचे भाववाढ आटोक्यात येत नसल्याने मागील दीड महिन्याआधी पशुपालकांनी दुधाच्या दरात वाढ केली; मात्र सरकी ढेपीचे भाव पुन्हा वरचढ झाले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सरकी ढेपीचे भाव चार हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे पशुपालक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. दूध विक्री परवडत नसल्याने आता पशुपालक पुन्हा भाववाढ करण्याच्या मन:स्थितीत आहेत. पॅकिंग दुधाचे भाव मात्र स्थिरसरकी ढेपीचे भाव सातत्याने वाढत असल्याने पशुपालकांनी दुधाच्या भावात वाढ केली; मात्र विविध कंपन्यांकडून येणाºया पॅकिंग दुधाचे भाव मात्र स्थिर आहेत. अनेकांनी पशुपालकांकडील दूध बंद करून पॅकिंगचे दूध सुरू केले आहे. ‘एनसीडीईएक्स’वर मोठी साठवणूकसरकी ढेपीची साठवणूक सटोडियांसह एनसीडीईएक्सवर (नॅशनल कमोडिटी अॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमि.)देखील होत आहे. विशेष म्हणजे, अलीकडचे भाव ३९०० रुपये प्रतिक्विंटल अन् डिसेंबर-जानेवारीचे भाव २१०० च्या घरात दाखविले जात आहेत. एनसीडीईएक्सवर १८ सप्टेंबरपर्यंत अकोल्यात ३४७ टन आणि कडी येथे ९९० टन सरकी ढेपीची साठवण अधिकृतपणे दाखविली जात आहे. याशिवाय स्थानिक व्यापारी आणि इतर सटोडियांची साठवणूक वेगळी आहे. दुधाळ जनावरांसाठी सरकी ढेप संजीवनीविदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचा मोठा पेरा आहे. त्यामुळे कापूस प्रक्रिया उद्योग या परिसरात विकसित झालेत. जिनिंग फॅक्टरी, सरकी तेल, काळा साबण आणि चोथ्यापासून सरकी ढेपीची निर्मिती होते. दुधाळ जनावरांना चाºयासोबत सरकी ढेपीचा काला दिल्यास दुधाळ जनावरांच्या दुधात मोठ्या प्रमाणात वाढ होते. याचे अनुभव पशुपालकांना आल्याने देशभरातील सरकी ढेपीला मागणी आहे. त्यामुळे सटोडिये सरकी ढेपीची साठवणूक करतात.