शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

७० लाखांच्या धान्य घोटाळ्यातील भांडारपाल जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 2:26 PM

न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळामध्ये असलेल्या राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील धान्याची पोती गायब करीत तब्बल ७२ लाख रुपयांचा घोटाळा करणारा भांडारपाल मनोज टीकाराम बुंदेले याला एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.राज्य वखार महामंडळाचे भांडारपाल सचिन ढवळे यांनी २१ एप्रिल २०१९ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार नोव्हेंबर २०१४ ते मार्च २०१७ या कालावधीत भांडारपाल असलेला मनोज टीकाराम बुंदेले याने त्याच्या कार्यकाळात वखार महामंडाळाच्या गोदामातील ३ हजार १३९ पोती गहू, एक हजार ४९३ पोती तांदूळ असा एकूण ६३ लाख ५० हजार ९६६ रुपयांचा धान्य घोटाळा, तर याव्यतिरिक्त ७ लाख ९ हजार ८२२ रुपयांचा अग्रिम खर्चाचा हिशेब बुंदेले याने दिला नाही. यासोबतच ग्रे क्लॉथ बेलचे १ लाख ४७ हजार ६७३ रुपयांचे देयक बुंदेले याच्या हलगर्जीमुळे नामंजूर करण्यात आले. यासोबतच पाण्याच्या देयकामध्ये १२ हजार रुपयांचा घोळ असा एकूण ७२ लाख २० हजार ७७३ रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी मनोज टीकाराम बुंदेले याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४०६, ४०८, ४०९, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी तेव्हापासून फरार असताना एमआयडीसी पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत असताना सदर आरोपीची माहिती मिळताच एमआयडीसीचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी आरोपीस शुक्रवारी अटक केली. त्यानंतर आरोपी मनोज टीकाराम बुंदेले याला प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या आरोपीने मंगरूळपीर येथेही अशाच प्रकारचा घोळ केल्याची माहिती असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास आणखी रॅकेट बाहेर येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी