अकोला : वादळी पावसाच्या तडाख्यात ५ जून रोजी जिल्ह्यातील अकोला व बाळापूर या दोन तालुक्यात २८६ घरांचे नुकसान झाले. नुकसानाचा प्राथमिक अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.मंगळवार, ५ जून रोजी जिल्ह्यात वादळासह जोरदार पाऊस बरसला. वादळी पावसाच्या तडाख्यात अकोला शहरासह अकोला व बाळापूर या दोन तालुक्यांत घरांचे नुकसान झाले. अनेक घरांवरील पत्रे उडाली असून, कवेलू फुटले, तसेच काही घरांची पडझड झाली आहे. अकोला व बाळापूर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन्ही तालुक्यात २८६ घरांचे अंशत: नुकसान झाले. दोन्ही तालुक्यातील घरांच्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ६ जून रोजी सायंकाळी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.दोन तालुक्यात घरांचे अंशत: असे झाले नुकसान!तालुका घरेअकोला २००बाळापूर ८६............................................एकूण २८६