अकोला : मागील दोन वर्षापासून पाऊस कमी होत असल्याने विदर्भातील संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. यावर्षी पुन्हा पावसाचा ताण पडल्याने अंबिया बहारावर परिणाम होण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.यावर्षी जानेवरी, फेब्रुवारी महिन्यात अंबिया बहार येईल, त्यावेळी पाण्याची नितांत गरज असते तथापि पाण्याचा ताण जाणवण्याची शक्यता असल्याने जेथे पाणी नाही तेथील शेतकºयांनी अंबिया बहार घेण्याचे टाळावे असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकºयांना दिला आहे.तदवतच मृग बहाराचे फळ जर झाडाला असतील तर तेही काढावे लागणार असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणने आहे.ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी ठिबकव्दारे झाडांना पाणी द्यावे तसेच झाडाच्या बुध्यांजवळ गवत, पालापाचोळ््याचे मल्चिंग केल्यास पाण्याची बचत करता येणार आहे.राज्यात सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर संत्रा फळ पिकांचे क्षेत्र विदर्भात आहे; परंतु सतत हवमान बदलत असून,पावसाच्या अनिश्चिततेचा प्रतिकूल परिणाम या फळ पिकावर होत आहे. सन २००५ मध्ये पाऊस नव्हता, परिणामी शेतकºयांवर संत्रा झाडे तोडण्याची पाळी होती. त्यामुळे त्यावर्षी जवळपास ४० ते ५० हजार हेक्टरवरील संत्र्याची झाडे शेतकºयांनी तोडली होती.यावर्षी पाऊस नसल्याने आर्द्रता नाही, जमिनीतील पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा कमी झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.रोजगार हमी योजना व नंतर राष्टÑीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ क्षेत्र व उत्पादनात महाराष्टÑ देशात प्रथम क्रमांकावर आहे. परंतु सतत या ना त्या रोगाचा सामना करणारा संत्रा उत्पादक शेतकरी यावर्षी पाऊसच नसल्याने अडचणीत सापडला आहे.
गत दोन वर्षापासून पाऊस कमी होत असून, यावर्षीही तेच चित्र असल्याने शेतकºयांनी जे पाणी उपलब्ध नसेल तेथे अंबिया बहार घेऊ नये,मृग बहाराची फळे काढून घ्यावीत,पाणी बचतीसाठी मल्चिंग करावे.डॉ. दिनेश पैठणकर,संशोधक,लिंबू वर्गीय फळे,डॉ. पंदेकृवि, अकोला.