दिव्यांगांसाठी लसीकरण सुरू करावे!
अकाेला : जीवघेण्या काेराेना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनाने ठिकठिकाणी विशेष शिबिर आयोजित करावे, अशी मागणी भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नेरकर व महानगराध्यक्ष संतोष अग्रवाल यांनी केली आहे.
-----------
लसीकरणासाठी पुढाकार घ्या!
अकाेला : शहरातील ४५ वर्षे वयोगटातील व त्यापेक्षा जास्त असलेल्या नागरिकांनी काेराेना लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून व चेहऱ्यावर मास्क आणि हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.
---------------
‘लसीकरणाच्या ठिकाणी सुविधा द्या!’
अकाेला : काेराेना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरात महापालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस घेता येणार आहे. दरम्यान, लसीकरणाच्या ठिकाणी बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाेबतच उन्हापासून संरक्षण व पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.