अकाेला: जिल्हा पाेलिस दलातील १९५ रिक्त पदे भरण्यासाठी १९ जून पासून मैदानी चाचणी परीक्षेला प्रारंभ हाेणार आहे. निमवाडीस्थित पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर ही प्रक्रिया पार पडणार आहे. यादरम्यान, उमेदवारांनी डमी उमेदवार दिल्याचे आढळून आल्यास संबंधितांविराेधात कठाेर कारवाइ करण्याचा इशारा जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.
जिल्हा पाेलिस दलात पाेलिस शिपाइ पदाच्या १९५ रिक्त जागांसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये १६ हजार १६१ पुरुष उमेदवार, ५ हजार ६९१ महिला उमेदवार तसेच तृतीयपंथी पुरु पुरुष उमेवाराची संख्या एक आहे. उमेदवारांची मैदानी चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आदी प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली जाणार असल्याचे जिल्हा पाेलिस अधीक्षक सिंह यांनी स्पष्ट केले आहे. नियाेजनानुसार पुरुष व महिला उमेदवारांची परीक्षा घेण्यासाठी पाेलिस दलातील वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांची चमू कामाला लागली आहे. अत्याधुनिक उपकरणांचा वापरपदभरती प्रक्रियेत १०० मिटर, ८०० मीटर, व १६०० मिटर धावण्याची चाचणी पारदर्शक होण्यासाठी तसेच उमेदवारांची उंची व छाती मोजण्यासाठी तांत्रिक उपकरणांचा वापर केला जाणार आहे. बायाेमेट्रिक पध्दतीने उमेदवारांची ओळख केली जाइल. ही प्रक्रिया पारदर्शक व शिस्तप्रिय पध्दतीने होणार असून यासाठी ३० पोलिस अधिकारी व २३२ पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.उमेदवारांना मिळणार चार दिवसांची मुदतज्या उमेदवारांना पाेलिस पदभरतीसाठी एकाच दिवशी दोन ठिकाणी वेगवेगळ्या पदासाठी किंवा लागोपाठ मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणीसाठी तारीख देण्यात आली असेल, अशा उमेदवारांना एका ठिकाणची पडताळणी आटाेपल्यानंतर दुस-या जिल्हयात जाण्यासाठी किमान ४ दिवसांच्या अंतराने पदभरतीसाठी मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना अडचण असल्यास त्यांनी raunak.sarafa mahait.org यावर ईमेल करावा, असे जिल्हा पाेलिस अधीक्षक सिंह यांनी स्पष्ट केले.
परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांनी काेणाच्याही आमिषाला, भुलथापांना बळी पडू नये. ही परीक्षा पारदर्शपणे राबवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून त्यावर आमची करडी नजर आहे. उमेदवारांनी प्रामाणीकपणे परीक्षेला सामाेरे जावे.- बच्चन सिंह, जिल्हा पाेलिस अधीक्षक अकोला