कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. जिल्हाधिकारी यांनी १० मेच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू केले. शहरातील सर्व दुकाने, हॉटेल, प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद होती, तर बँक व पतसंस्था उघड्या असल्या तरी व्यवहार बंदचे आदेश होते. सकाळपासून पोलीस आपल्या वाहनातून कोणीही घराबाहेर पडू नये तसेच लॉकडाऊनचे जनतेने पालन करावे, असे आवाहन करताना नगरपरिषद व महसूल विभागाचे पथकसुद्धा चौकात दिसून आले. मात्र अशातही तुरळक प्रमाणात दुचाकी वाहनधारकांची ये - जा सुरू होती. सहा दिवस सर्व बंद राहणार म्हणून नागरिकांनी ९ व ९ मे रोजी खरेदीसाठी मोठी गर्दी करीत आवश्यक असलेली सर्व खरेदी किंवा कामे करून घेतली.
फोटो:
सतत नऊ दिवस बँका बंद असल्याने अडचण
कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले असले तरी ८ व ९ मे रोजी शनिवार व रविवार असल्याने बँक बंद होत्या. लॉकडाऊन १५ तारखेपर्यंत असला तरी १६ तारखेचा रविवार असल्याने आता बँक १७ तारखेलाच उघडणार आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. दवाखान्यात असलेले रुग्णांचे नातेवाईक, शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.