सायखेड : नुकत्याच बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने मोबाइल घेऊन न दिल्याने आत्महत्या केल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील सारकिन्ही येथे शुक्रवार, २३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. रवी चंद्रभान परंडे (२०) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील सारकिन्ही येथील रवी चंद्रभान परंडे याने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. रवी हा सुद्धा मदत करीत शिक्षण घेत होता. त्याने आईकडे मोबाइल घेऊन देण्याची मागणी केली. त्यानुसार आईने पैशांची जुळवाजुळव करीत ११ हजार रुपाये जमा केले. दोन दिवस थांब तुला मोबाइल घेऊन देतो, असे रवीला सांगितले; मात्र २३ जुलै रोजी रवीने शेतात कामाला जाण्यास नकार दिला. त्यामुळे घरातील सर्व जण शेतात कामाला गेले असता रवीने दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पिंजर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. केवळ मोबाइल घेऊन न दिल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, बहीण असा आप्त परिवार आहे.
मोबाइल घेऊन न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:49 AM
मोबाइल घेऊन न दिल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील सारकिन्ही येथे , २३ जुलै रोजी घडली.
ठळक मुद्दे रवी चंद्रभान परंडे (२०) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.रवीने दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.