शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

 आर्थिक परिस्थितीवर मात करीत रितेशने गाठले यशोशिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 3:23 PM

अकोला: कौलखेडमधील जेतवन नगरातील (धोबी खदान)राहणारा रितेश गोविंद मोहोड याने माध्यमिक शालान्त परीक्षेत ८८.४० टक्के गुण मिळविले. १०० टक्केच्या गुणवत्ता यादीत ८८ टक्के गुण म्हणजे फारच कमी झालेत; परंतु रितेशने हे गुण आर्थिक परिस्थितीवर मात करीत मिळविले आहे. निश्चितच हे गुण १०० टक्केच्या बरोबरीचेच आहेत.

ठळक मुद्देरितेशची आई वंदना मोहोड दुसऱ्यांच्या घरची धुणी-भांडी करते. स्वत:च्या घरची कामे शाळा व अभ्यास सांभाळून रितेशलाच करावी लागत होती. नियमित अभ्यास करू न आपले छंद जोपासत यशोशिखराकडे वाटचाल करावी, असे रितेशने लोकमतसोबत संवाद साधताना सांगितले.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: कौलखेडमधील जेतवन नगरातील (धोबी खदान)राहणारा रितेश गोविंद मोहोड याने माध्यमिक शालान्त परीक्षेत ८८.४० टक्के गुण मिळविले. १०० टक्केच्या गुणवत्ता यादीत ८८ टक्के गुण म्हणजे फारच कमी झालेत; परंतु रितेशने हे गुण आर्थिक परिस्थितीवर मात करीत मिळविले आहे. निश्चितच हे गुण १०० टक्केच्या बरोबरीचेच आहेत.रितेश हा गायत्री नगरातील इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी. रितेशची आई वंदना मोहोड दुसऱ्यांच्या घरची धुणी-भांडी करते. वडील गोविंद मोहोड शहरातील होलसेल मेडिकल प्रतिष्ठानात सेल्समन आहेत. मोठी बहीण रेशमा सध्या एएनएम नर्सिंग प्रशिक्षणाच्या दुसऱ्या वर्षाला आहे. आई-वडील क ामावर आणि बहीण कॉलेजमध्ये जात असल्याने स्वत:च्या घरची कामे शाळा व अभ्यास सांभाळून रितेशलाच करावी लागत होती. दहावीला असतानासुद्धा रितेशने घरातील कामे केली.रितेशची लहानपणापासूनच हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणना व्हायची. खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या स्वाती राठोड-सिरसाट यांच्या संपर्कात रितेश आल्यानंतर रितेशचे जीवनच बदलून गेले. तिसऱ्या वर्गापासून रितेश स्वातीतार्इंकडे अभ्यासाला जातो. रितेशची परिस्थिती पाहून स्वातीतार्इंनी त्याच्याकडून कोणताही मोबदला कधीच घेतला नाही. स्वातीताईं मला लहान भाऊ मानतात. त्यांच्यामुळेच आज हे यश मिळाले असल्याचे रितेशने प्रांजळपणे सांगितले. रितेशला अभ्यासाव्यतिरिक्त नृत्य करायची आवड आहे. अनेक नृत्य स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकाविला. नृत्यातील असा एकही प्रकार नसेल, जो रितेश करीत नाही. सर्व प्रकारचे नृत्य रितेश सहज करतो; मात्र रितेशला भविष्यात अ‍ॅस्ट्रोफिजिस्ट व्हायचे आहे. रितेशचा फिजिक्स हा विषय आवडीचा आहे. कोणीही आपल्या आर्थिक परिस्थितीची लाज बाळगू नये, जीवनात संकट येत असतात; मात्र आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करू न आपले छंद जोपासत यशोशिखराकडे वाटचाल करावी, असे रितेशने लोकमतसोबत संवाद साधताना सांगितले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSSC Results 2018दहावी निकाल २०१८