शिष्यवृत्तीधारक अकोल्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांमध्ये प्रभात किड्स स्कूलचे ख्याती नितीन लोया, साहिल राजू वाडकर, तनया भास्कर काकड, अथर्व सुधाकर डाबेराव, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे कुलदीप संदीप ठाकरे, लक्षिता अनुप संतानी, यश रामेश्वर चव्हाण, माऊंट कारमेल शाळेचे पार्थ संदीप फडके, अक्षय संदीप पारसकर, अनिष नितीन गावंडे, श्रीया मंगेश तुळसकर, स्कूल ऑफ स्कॉलर्सचे नचिकेत सुरेश महल्ले, ओम अतुल गायकवाड, राजनंदिनी महेश मानधने, होली क्रॉस कॉन्व्हेंटचे आदित्य नरेश साहु, ध्रुव शशांक फुरसुले, आदींचा समावेश आहे.
राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समितीच्या वतीने एनटीएसई शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे संयोजक डॉ. रवींद्र भास्कर, डॉ. शशिकांत बांगर, सुकुमार नवले, प्रताप देशपांडे, सुधाकर मेतकर, भरतकुमार लाड, सयाजीराव पाटील, अरुण गायकवाड, आदींनी कौतुक केले आहे.
अशी मिळते शिष्यवृत्ती
शालांत परीक्षेनंतर २ स्तरावर दोन वर्ष (इ.११ वी व इ. १. वी)-१२५० रुपये, सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत -२००० रुपये, सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत(पदव्युत्तर पदवीपर्यंत)-२००० रुपये, पीएच.डी.साठी ४ वर्षांपर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर शाखांसाठी)- विद्यापीठ आयोगाचे नियमानुसार मान्य दराने शिष्यवृत्ती देण्यात येते.
फोटो :