अकोट शहरातील राजे संभाजी अकॅडमी समोर जमलेल्या विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवित आयोगाच्या धोरणाचा निषेध केला. परीक्षेला अवघे तीन दिवस शिल्लक असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणे हे चूकीचे आहे. सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा. अशी मागणी राजे संभाजी अकादमीचे संचालक राजीव खारोडे यांनी केली. १४ मार्च रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परिपत्रक एमपीएससीकडून जारी करण्यात आले असून त्यामध्ये नव्या तारखा जाहीर केल्या जातील असे म्हटल्यामुळे नेमक्या परीक्षा कधी होणार? याविषयी देखील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे असे आयोगाने म्हटले आहे. कोरोना संसर्ग आणि ताळेबंदीमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून थांबविण्यात आल्या. याआधी माहे एप्रिल, सप्टेंबर २०२० मध्ये होणार? होती. ती पुढे लांबणीवर पडली. एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी दिली.
फोटो: अकोट स्टुडंट नावाने