शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

विद्यार्थ्यांना उजळणी, बाराखडीचा पडू लागला विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क संतोषकुमार गवई पातूर : कोरोनाकाळात शाळा बंद, पण ऑनलाइन शिक्षण सुरू अशी स्थिती होती. या काळात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संतोषकुमार गवई

पातूर : कोरोनाकाळात शाळा बंद, पण ऑनलाइन शिक्षण सुरू अशी स्थिती होती. या काळात ऑनलाइन शिक्षण घेत हायटेक बनलेल्या विद्यार्थ्यांना चक्क बाराखडी आणि उजळणीचा विसर पडला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मार्चपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणाची सुविधा केली आहे. परंतु, हे शिक्षण म्हणावे तसे प्रभावी राहिले नाही. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाइल हातात पडतात. मुले पे-गेम कार्टून यासारख्या खेळात रंगू लागली आहे. तसेच जास्तीतजास्त वेळ टीव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवत आहेत. शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसरीपासूनच मुलांना उजळणी मुखोद्गत होऊ लागली. परंतु, आता शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जाऊ लागले आहे. चौथी, पाचवीच्या मुलांना भागाकार आणि गुणाकार कसा करायचा, याचा विसर पडला आहे. जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तके वाटप झाली. परंतु, कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदा कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, हे सुद्धा माहिती नाही. ऑनलाइन शिक्षण केवळ २० ते ३० टक्के विद्यार्थी प्रामाणिकपणे करीत असावेत. परंतु, इतरांचे काय? त्यातही यावर्षी परीक्षा रद्द झाल्याने मुले तेवढीच बिनधास्त झाली. परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा, असे प्रत्युत्तर मुलेच पालकांना देऊ लागले आहेत. यापेक्षा वास्तव अनुभव यावा म्हणून यावर्षी जून महिन्यात इयत्ता पहिली वर्गात नवीन प्रवेश देण्यात आले. पण, वर्षभर शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शाळा पाहिली नाही किंवा गुरुजीची भेट झाली नाही. तसेच बाराखडी अक्षरे गिरविले नाही, तरीही मुले आरटीई कायद्यातील नियमाप्रमाणे दुसरीत प्रविष्ट झाली. शाळास्तरावर विद्यार्थ्यांना दीक्षा ॲप, गुगल मीट यासारख्या शैक्षणिक साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यात आले. परंतु, विद्यार्थ्यांनी त्याकडे नियमितपणे पाठ फिरविली. ज्ञानाची ही पोकळी भरून काढण्यासाठी आता येणाऱ्या पुढील काळात शिक्षकांना मात्र चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

----------------------

नव्या शैक्षणिक सत्रात कसरत

मागील वर्षापासून शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले. त्यामुळे सर्वच विद्यार्थी अभ्यासापासून दुरावले आहे. साहजिकच, त्यांच्या ज्ञानाच्या पातळीत मोठा फरक जाणवत आहे. परिणामी, भविष्यात या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिक्षकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.