नागरिकांना विविध कामानिमित्त बाळापूर, शेगाव, अकोला येथे जावे लागते. शहरात जाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हातरुण, शिंगोली, दुधाळा, मंडाळा, बोरगाव वैराळे, धामणा, मालवाडा येथील ग्रामस्थांना अकोला येथे जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. हातरुण येथे धामणा, बोरगाव वैराळे, मालवाडा, लोणाग्रा, शिंगोली, दुधाळा, मंडाळा येथील विद्यार्थीही त्रस्त झाले आहेत. बसफेरी बंद असल्याने कडाक्याच्या थंडीत पायी शाळेत जावे लागते. शासनाने बससेवा सुरू केल्यास शाळेत वेळेवर पोहोचता येईल, अशी प्रतिक्रिया बाेरगाव येथील विद्यार्थी तुषार दांगटे याने दिली.
.........कोट.........
ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पायी यावे लागते. बसफेरी सुरू नसल्याने शाळेत वेळेवर पोहाेचता येत नाही, त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील बससेवा सुरू करणे गरजेचे आहे.
राम गव्हाणकर, जिल्हा परिषद सदस्य
.........................कोट.......
इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरू केले आहेत. बसफेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षणासाठी पायी यावे लागते. हातरुण ते धामणा बसफेरी सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत येणे सोईचे होईल.
- प्रा. रविकिरण हेलगे, महात्मा गांधी विद्यालय, हातरुण