शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत!

By admin | Published: July 15, 2017 1:19 AM

मूर्तिजापूर : पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार आदर्श ग्राम कोळंबीच्या शाळेत उजेडात आला आहे.

गणेश मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : गाव आदर्श... गावातील शाळाही डिजिटल; मात्र पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार आदर्श ग्राम कोळंबीच्या शाळेत उजेडात आला आहे.कोळंबी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक व माध्यमिक शाळा राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने अपघाताच्या भीतीमुळे ही शाळा इतरत्र हलविण्याची मागणी पालकांनी केली. त्यामुळे गावापासून एक कि.मी. अंतरावर शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. शाळेतच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या आवारातच कूपनलिका (बोअर) करण्यात आली; परंतु पाणीच न लागल्याने ही बोअर ‘फेल’ गेली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था करून देण्याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला; मात्र सर्व शिक्षा अभियानांतर्गत बोअर करण्यात आल्याने पाण्यासाठी दुसरी कोणतीही योजना शाळेसाठी देण्यात येणार नसल्याची भूमिका पाणीपुरवठा विभागाने घेतली. स्थानिक ग्रामपंचायतनेही शाळेत पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी, विद्यार्थी व शिक्षकांना दररोज पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहाराचे वाटप करावे लागते. त्यामुळे आहार तयार करण्यासाठी शाळेत येताच विद्यार्थ्यांना पाण्याची सोय करावी लागते. शाळेपासून थोड्या अंतरावर खांबोरा पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन टाकली आहे. या योजनेच्या लिकेजमधून विद्यार्थी दररोज पाणी आणतात. विशेष म्हणजे, पाणी आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तारांच्या कुंपणातून मार्ग काढावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असली, तरी शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतीचे या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.गुरुजींचीही पायपीटशालेय पोषण आहार नियमित तयार करावा लागत असल्याने गुरुजींनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यापूर्वी अनेक महिने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून पाण्याची सोय करण्यातच शिक्षकांचा बराच वेळ जात असल्याचे येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले आहे. आजही विद्यार्थी आणि शिक्षक दररोज सोबतच शाळेत पाणी आणण्याचे काम करीत आहेत. शाळेतच पाण्याची सोय असावी, यासाठी ग्रामपंचायत आणि वरिष्ठ कार्यालयांकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. शाळेत पाणी नसल्याने नाइलाजास्तव विद्यार्थी व शिक्षकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागती.- नितीन बंडावार,प्रभारी मुख्याध्यापक, जि. प. शाळा, कोळंबी.