अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत बाळापूर तालुक्यातील सेमी इंग्लिशच्या इयत्ता १ ते ३ आणि ५ ते ८ मधील विद्यार्थ्यांना हिंदी (सुलभभारती)चे पुस्तक अद्यापही वाटप झालेले नाही. विशेष म्हणजे, त्याऐवजी हिंदी माध्यमाचे सुगम भारती पुस्तक मिळाले, तर पहिली व तिसरीसाठी पुस्तकांची मागणीच न केल्याने हा घोळ झाल्याची माहिती आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. चालू वर्षात सत्राचे दोन महिने उलटले, तरीही बाळापूर तालुक्यातील पहिली ते तिसरी, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तक मिळालेले नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंंचावण्यासाठी सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. त्याचवेळी जिल्हा परिषद शाळा कॉन्व्हेंटसोबत स्पर्धा करीत आहेत. त्यासाठी या शाळांना सेमी इंग्लिश दर्जा मिळताच विद्यार्थ्यांचा ओढा या शाळांमध्ये वाढला आहे; मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बाळापूर तालुक्यातील सर्व शाळांतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या हिंदी (सुलभभारती) विषयापासून वंचित आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमासाठी असलेल्या सुगम भारती या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच पहिली ते तिसरीच्या पुस्तकांची प्रशासनाने मागणीच केली नाही. त्यामुळे विद्यार्थी शालेय सत्र सुरू होऊन दोन महिने उलटले, तरीही वंचित आहेत. विद्यार्थ्यांची ही समस्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सोडवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मिळालीच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:08 PM
अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत बाळापूर तालुक्यातील सेमी इंग्लिशच्या इयत्ता १ ते ३ आणि ५ ते ८ मधील विद्यार्थ्यांना हिंदी (सुलभभारती)चे पुस्तक अद्यापही वाटप झालेले नाही.
ठळक मुद्देसर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. बाळापूर तालुक्यातील पहिली ते तिसरी, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तक मिळालेले नाही.